यवतमाळ, 26 डिसेंबर : यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा पत्नी सोबत डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त हिट झाला आहे. त्यांच्या कुटुंबातील लग्नसोहळ्यातील संगीत समारोह कार्यक्रमामध्ये संजय राठोड यांनी पत्नीसह ठेका धरला आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
राजकीय क्षेत्र म्हटलं की अत्यंत धकाधकीचे जीवन आणि कुटुंबापेक्षा सार्वजनिक क्षेत्रामध्ये नेत्यांना वावरावे लागते. या व्यस्ततेत अनेकदा पारिवारिक सोहळ्यात ते उपस्थित राहू शकत नाही. त्यातही नेता जर मंत्री असेल तर मग त्यांची व्यस्त दिनचर्या वेगळी सांगायची गरज नाही.
अशाही परिस्थितीमध्ये कौटुंबिक सोहळ्यासाठी संजय राठोड उपस्थित राहिले आणि पत्नीसोबत एका रोमँटिक गाण्यावर ठेकाही धरला. सध्या त्यांचा हा व्हिडिओ जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. राठोड यांच्या कुटुंबात विवाह समारंभाचे आयोजन आहे. त्यानिमित्त कौटुंबिक संगीत समारोहचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी पालकमंत्री संजय राठोड आणि त्यांची पत्नी शीतल राठोड हे देखील आवर्जून उपस्थित होते.
यावेळी उपस्थित कुटुंबातील सदस्यांनी आग्रह केल्यानंतर या उभयतांनी डान्स करून आपल्या कौटुंबिक प्रेमाचा परिचय दिला आहे.