Home /News /maharashtra /

VIDEO : लॉकडाऊननंतर बळीराजावर अस्मानी संकट, पुरामध्ये उरलं सुरलंही वाहून गेलं

VIDEO : लॉकडाऊननंतर बळीराजावर अस्मानी संकट, पुरामध्ये उरलं सुरलंही वाहून गेलं

पुराचा प्रवाह एवढा प्रचंड होता की गेल्या 50 वर्षात अशा प्रकारच्या पूर आला नाही असे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले.

  यवतमाळ, 16 जुलै: कोरोना आणि लॉकडाऊनच्या संकटातून सावरणाऱ्या बळीराजावर पुन्हा एकदा अस्मानी संकट ओढवलं आहे. मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामध्ये नुकतंच लावलेलं पीक वाहून गेल्यानं बळीराजासमोर जगाचं कसं हा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा यवतमाळमधील नेर तालुक्याला मोठ्या प्रमाणात फटका बसला. पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहू लागले आणि पुराचा फटका बळीराजाला बसला. मंगलादेवी,  गौळण, माणिकवाड, पिंपरी मुक्तापूर, अजंती शिरजगाव, वटफळी, मालखेड, या गावातील शेकडो एकर शेतातील पिकं पाण्याखाली गेली. एकाच दिवसात नेर तालुक्यात 56 मिलिमीटर पाऊस कोसळला. या पावसामुळे तालुक्यातील मांगलादेवी लगत असलेल्या मिलमिली नदीला पूर आला. नदीलगत असलेल्या शेतामध्ये पाणी शिरले. पाण्याच्या प्रवाहानं नुकतीच लावलेली छोटी रोपंही आपल्यासोबत नेली. Maharashtra Board HSC Result 2020 : बारावीचा निकाल इथे पाहू शकता.
  लावलेलं पीकही पाण्याखाली गेल्यानं शेतकरी चिंतातूर झाला आहे. पुराचा प्रवाह एवढा प्रचंड होता की गेल्या 50 वर्षात अशा प्रकारच्या पूर आला नाही असे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले. आधीच दुबार पेरणी, बोगस बियाणे या सुलतानी संकटात सापडलेला शेतकरी त्यानंतर कोरोना आणि लॉकडाऊनमुळे झालेलं नुकसान यातून सावरत असतानाच आता हे अस्मानी संकट कोसळलं आहे. तातडीनं या अस्मानी संकटाचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी करत आहे.
  Published by:Kranti Kanetkar
  First published:

  Tags: Yavatmal

  पुढील बातम्या