शिवसेनेच्या आंदोलनावेळी राडा, खासदारासमोरच शिवसैनिकाची अधिकाऱ्याला मारहाण

शिवसेनेच्या आंदोलनावेळी राडा, खासदारासमोरच शिवसैनिकाची अधिकाऱ्याला मारहाण

शिवसेना खासदार भावना गवळी यांनी विमा कंपनीवर मोर्चा काढला. मात्र यावेळी घडलेला प्रकार सध्या जिल्हाभरात चर्चेचा विषय ठरत आहे.

  • Share this:

यवतमाळ, 28 डिसेंबर : यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे खरीप हंगामामध्ये अतोनात नुकसान झाले. मात्र विमा कंपनीने मोजक्याच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी शिवसेना खासदार भावना गवळी यांनी विमा कंपनीवर मोर्चा काढला. मात्र यावेळी घडलेला प्रकार सध्या जिल्हाभरात चर्चेचा विषय ठरत आहे.

शिवसैनिक जवाब विचारण्यासाठी विमा कंपनीच्या कार्यालयात गेले असता मॅनेजरने समाधानकारक उत्तर न दिल्याने संतप्त झालेल्या संतोष ढवळे यांनी मॅनेजरला मारहाण केली. खासदार भावना गवळी यांच्यासमोरच हा सर्व प्रकार घडला.

गेल्या वर्षी खरीप हंगामात यवतमाळ जिल्ह्यातील 4 लाख 67 हजार 21 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. त्यासाठी या शेतकऱ्यांनी 158 कोटी रुपयांचा भरणा केला. दुर्दैवानं अतिपावसामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन, कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला. अशा परिस्थितीतही विमा कंपनीने 9 हजार 776 शेतकऱ्यांनाच नुकसान भरपाई दिली. उर्वरित 4 लाख 57 हजार 245 शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात आली.

या शेतकऱ्यांना सुद्धा नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. याबाबत संसदेमध्ये आवाज उठवू, असं खासदार भावना गवळी यांनी शेतकऱ्यांना संबोधित करतांना सांगितलं आहे.

शेतकऱ्यांच्या विम्याच्या मागणीसाठी खासदार भावना गवळी यांनी स्थानिक स्टेट बँक चौकातून जवाब दो आंदोलनाला सुरुवात केली. त्यानंतर आंदोलक जाब विचारण्यासाठी विमा कंपनीच्या कार्यालयात गेले.। या ठिकाणी मॅनेजरने समाधानकारक उत्तर न दिल्याने यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे चांगलेच संतापले आणि त्यांनी मॅनेजरला खुर्चीतून ओढून मारहाण केली।. त्यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत शिवसैनिकांना शांत केलं.

दरम्यान, आजच्या या आंदोलनात जिल्ह्यातील हजारो शेतकरी आणि शिवसैनिक सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान विमा कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मात्र या आंदोलनातून सेनेतील गटबाजी उघड झाली झाली. पालक मंत्री संजय राठोड यांचा कोणत्याही बॅनरवर फोटो वापरण्यात आला नाही.। शिवाय पालकमंत्री गटाचा एकही पदाधिकारी आंदोलनावेळी तिकडे फिरकला नाही.

Published by: Akshay Shitole
First published: December 28, 2020, 8:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading