Home /News /maharashtra /

भरदिवसा डॉक्टरची गोळ्या झाडून हत्या; अवघ्या काही तासांत आरोपींच्या आवळल्या मुसक्या, धक्कादायक कारण आलं समोर

भरदिवसा डॉक्टरची गोळ्या झाडून हत्या; अवघ्या काही तासांत आरोपींच्या आवळल्या मुसक्या, धक्कादायक कारण आलं समोर

भरदिवसा डॉक्टरची गोळ्या झाडून हत्या; आरोपींच्या आवळल्या मुसक्या, धक्कादायक कारण आलं समोर

भरदिवसा डॉक्टरची गोळ्या झाडून हत्या; आरोपींच्या आवळल्या मुसक्या, धक्कादायक कारण आलं समोर

Yavatmal Dr Hanumant Dharmakare murder case solved: उमरखेडमधील डॉक्टर हनुमंत धर्मकारे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आता पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.

यवतमाळ, 16 जानेवारी : यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड (Umerkhed Yavatmal) येथे 11 जानेवारी डॉक्टर हनुमंत धर्मकारे (Dr Hanumant Dharmakare) यांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. या घटनेमुळे उमरखेडच्या शासकीय रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणात पोलिसांनी कसून चौकशी आणि तपास केला त्यानंतर चार आरोपींना पोलिसांनी अटक (4 accused arrested) केली आहे. आरोपींना अटक झाल्याने या हत्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. (Yavatmal Dr. Hanumant Dharmakare murder case solved) धक्कादायक कारण आलं समोर आरोपीचा सुगावा लागत नसल्याने आरोपीचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. अखेर सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. डॉक्टर हनुमंत धर्मकारे यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. एका रुग्णाचा दोन वर्षांपूर्वी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा राग आरोपींच्या डोक्यात होता. त्यामुळे डॉ धर्मकारे यांची हत्या करण्यात आल्याचं धक्कादायक वास्तव्य पुढे आले आहे. वाचा : रुग्णालयाच्या दारातच डॉक्टरावर गोळीबार, यवतमाळ हादरलं काय आहे संपूर्ण प्रकरण? दोन वर्षांपूर्वी म्हणजे मे 2019 मध्ये शेख अरबाज शेख अब्रार याचा उमरखेड शहरातील शिवाजी चौक जवळ मोटार सायकलने अपघात झाला होता. या अपघातात अरबाज गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालय उमरखेड येथे दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान जखमी अरबाजचा मृत्यू झाला. त्या वेळेस डॉ हनुमंत धर्मकारे हे कर्तव्यावर होते. त्यांच्या हलगर्जीपणामुळे जखमीचा मृत्यू झाला असा नातेवाईकांनी आरोप केला होता. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांत देखील गेले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरण हाताळले. मात्र त्यावेळेस मृतकाचा लहान भाऊ एजाज अब्रार शेख आणि इतर नातवाईकांनी डॉक्टरला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. या घटनेच्या आधारे पोलिसांनी तपासचक्रे फिरवली. वाचा : 20 वर्षीय तरुणीवर कारमध्ये रेप, निर्जनस्थळी नेऊन शेजाऱ्यानेच दिल्या नरक यातना सीसीटीव्हीची मोठी मदत सीसीटीव्हीमध्ये दिसत असलेला संशयित हा शेख एफाज शेख अब्रार याच्या सारखा शरीरयष्टीचा दिसत असल्याने पोलिसांनी आपल्या खबरीकडून माहिती काढली. असता एफाज उर्फ अप्पू शेख अब्रार याने आपले मामा आणि मित्रांच्या साहाय्याने डॉक्टरवर गोळया झाडून हत्या केल्याचं पुढे आले. आरोपीने आपल्या मृत भावाचा वचपा काढण्याच्या उद्देशाने डॉक्टरची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी सैय्यद तौसिफ सय्यद खलील, सय्यद मुश्ताक सय्यम खलील, शेख मौहसीन शेख कयुम, शेख शाहरुख शेख आलम यांना अटक करण्यात आली. 11 जानेवारीला डॉ हनुमंत धर्मकारे यांची उमरखेड शहरातील साकळे विद्यालयसमोर दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वैदयकीय क्षेत्रातील डॉक्टर रस्त्यावर उतरून न्यायाची मागणी करत होते. रुग्णसेवा ही बंद करण्यात आली होती, त्यामुळे आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव वाढला होता. पोलिसांनी वेगवेगळ्या मार्गाने तपास करून अखेर आरोपींना अटक केली आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Crime, Murder, Yavatmal

पुढील बातम्या