जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सुसाट, मात्र तरीही पालकमंत्र्यांच्या पदरी निराशा

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सुसाट, मात्र तरीही पालकमंत्र्यांच्या पदरी निराशा

पालकमंत्री संजय राठोड याचे निकटवर्तीय असलेल्या उमेदवारांना या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला.

  • Share this:

यवतमाळ, 22 डिसेंबर : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्वाधिक संचालक निवडून आले असून एकत्रित ताकदीमुळे महाविकास आघाडीने बँकेच्या निवडणुकीत बाजी मारली. मात्र पालकमंत्री संजय राठोड याचे निकटवर्तीय असलेल्या उमेदवारांना या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला.

महाविकास आघाडी जास्त जागा निवडून आणण्यात यशस्वी ठरली असली तरीही पालकमंत्री संजय राठोड यांचे काही निकटवर्तीय उमेदवारच निवडणुकीत पराभूत झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने राठोडांना हात दाखविल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात रंगू लागली आहे.

बँकेच्या 21 संचालकांसाठी ही निवडणूक झाली. त्यासाठी 1175 मतदारांनी मतदान केले. यावेळी महाविकास आघाडीने 16, अपक्ष 2 तर भाजपने 3 जागा जिंकल्यात. सर्वात महत्वाचे म्हणजे जिल्हा गटात अतिशय काट्याची लढत झाली असून दोन वेळा मत मोजणी घ्यावी लागली.शेवटी महाविकास आघाडीचे राजुदास जाधव 1 मतांनी निवडून आले. त्यांनी अपक्ष उमेदवार नाना गडबैले यांचा पराभव केला.

यावेळी विजयी उमेदवारांनी गुलाल उधळून जल्लोष केला.

दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दारुण पराभव झालेल्या भाजपमध्ये मात्र अस्वस्थता पसरली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: December 22, 2020, 11:46 PM IST

ताज्या बातम्या