लढत विधानसभेची : यवतमाळमध्ये मदन येरावार पुन्हा जिंकणार का?

यवतमाळची निवडणूक नेहमीच चुरशीची असते. यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार 5 वेगवेगळ्या खात्यांचे राज्यमंत्री आहेत. 2014 मध्ये भाजपचे मदन येरावार अटीतटीच्या लढाईत विजयी झाले होते.

News18 Lokmat | Updated On: Sep 20, 2019 07:59 PM IST

लढत विधानसभेची : यवतमाळमध्ये मदन येरावार पुन्हा जिंकणार का?

यवतमाळ,20 सप्टेंबर : यवतमाळची निवडणूक नेहमीच चुरशीची असते. यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार 5 वेगवेगळ्या खात्यांचे राज्यमंत्री आहेत. 2004 साली ते या मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. 2009 साली पुन्हा काँग्रेसने बाजी मारली. त्यावेळी काँग्रेसचे निलेश पारवेकर यांनी विधानसभेचं मैदान काबीज केलं. आमदार निलेश पारवेकर यांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर इथे पोटनिवडणूक झाली. त्या 2013 च्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसच्या नंदिनी निलेश पारवेकर यांनी मदन येरावार यांचा पराभव केला. त्यानंतर मात्र यवतमाळचं राजकीय वातावरण पुन्हा बदललं आणि 2014 मध्ये भाजपचे मदन येरावार अटीतटीच्या लढाईत विजयी झाले. तेव्हा मदन येरावार फक्त 1227 मतांनी जिंकले.

अटीतटीची लढत

मदन येरावार यांना 53 हजार 671 मतं मिळाली. शिवसेनेच्या संतोष ढवळे यांना 52 हजार 444 मतं मिळाली तर काँग्रेसचे राहुल ठाकरे यांना 33 हजार 152 मतं मिळाली. बसपाचे तारीक लोखंडवाला यांना 34 हजार 498 मतं मिळाली तर राष्ट्रवादीच्या संदीप बाजोरिया यांना 17 हजार 990 मतं मिळाली.

यावेळी भाजप -शिवसेना युतीमध्ये ही जागा भाजपकडे आहे. पण ही जागा शिवसेनेला मिळावी यासाठी शिवसेना प्रयत्न करतेय. शिवसेनेकडून पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी संतोष ढवळे तयारीला लागले आहेत.

काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांचा मुलगा राहुल ठाकरे यंदा निवडणुकीच्या रिंगणात नाहीत. त्यामुळे इथे काँग्रेसचा उमेदवार कोण याबदद्ल उत्सुकता आहे. काँग्रेसकडून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांचं नाव चर्चेत आहे.

Loading...

लोकसभा निवडणुकीच्या आधी कळंब विकास आघाडीचे प्रवीण देशमुख यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते स्वतः यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशावेळी प्रवीण देशमुख यांना काँग्रेसने तिकीट दिलं तर मी स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे, असं राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये पुन्हा चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. वंचित बहुंजन आघाडीचे उमेदवार कोण यावरही निकालाचं समीकरण बदलू शकतं.

2014 विधानसभा निवडणुकीतलं मतदान

मदन येरावार, भाजप - 53 हजार 671

संतोष ढवळे, शिवसेना - 52 हजार 444

राहुल ठाकरे, काँग्रेस - 33 हजार 152

==================================================================================================

VIDEO : बाळा नांदगावकर म्हणाले, 'मनसेसैनिक सज्ज आहे', पण...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 20, 2019 07:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...