यवतमाळमध्ये संपूर्ण कुटुंबावर काळाचा घाला, वीज पडून 6 जणांचा मृत्यू

यवतमाळमध्ये संपूर्ण कुटुंबावर काळाचा घाला, वीज पडून 6 जणांचा मृत्यू

कुटुंबातील सगळेच सदस्य या दुर्दैवी घटनेत मृत्यमुखी पडल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

  • Share this:

यवतमाळ, 30 मार्च : यवतमाळ जिल्ह्यातील राळेगावपासून 6 किमी अंतरावर असलेल्या गुजरी येथील शिवारात वीज कोसळून एकाच कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी उघडकीस आली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

गुजरी शिवारातील अरुण गोंडे यांचे निमगव्हान येथील शेतात गायी चारणारे कुटुंब काही दिवसांपासून गायी चाराईसाठी शेतातील शेडमध्ये मुक्कामी होते. काल, संध्याकाळी राळेगाव तसेच परिसरात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला. यावेळी गोंडे कुटुंब राहात असलेल्या छतावरच वीज कोसळली. यामध्ये अख्खंच्या अख्ख कुटुंब मृत्यूमुखी पडलं.

कुटुंबातील सगळेच सदस्य या दुर्दैवी घटनेत मृत्यमुखी पडल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. मृतकामध्ये चार पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. काळीज पिळवटून टाकणाऱ्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

दुसरीकडे, नाशिक जिल्ह्यातील येवल्यात एका कारला झालेल्या अपघातात आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 3 जण गंभीर जखमी आहे. येवल्याजवळ नाशिक-औरंगाबाद मार्गावर ही घटना घडली. टाटा इंडिका कारमधून 5 जण हे जात होते. अचानक टायर फुटल्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट पुलावर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर या कारमधील इतर 3 जण जखमी झाले आहे. जखमींना येवल्याच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

First published: March 30, 2020, 11:07 AM IST
Tags: yavatmal

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading