ज्या आईने जन्म दिला तिनेच मृत्यूही...3 वर्षाच्या मुलासह महिलेनं संपवलं जीवन

ज्या आईने जन्म दिला तिनेच मृत्यूही...3 वर्षाच्या मुलासह महिलेनं संपवलं जीवन

शेतातील विहिरीत दोघांचाही मृत्यूदेह तरंगत असल्याचा आढळला आहे.

  • Share this:

यवतमाळ, 9 ऑगस्ट : 3 वर्षाच्या मुलासह आईने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यात मारेगाव तालुक्यातील म्हैसदोडका येथे आज दुपारी दीडच्या सुमारास उघडकीस आली आहे.

मोनाली लक्ष्मण पारखी (29) जय लक्ष्मण पारखी (3) असे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करणाऱ्या आई व मुलाचे नावं आहे. प्राप्त माहितीनुसार मृतक मोनाली ही घरी मुलाला घेऊन शेतात जाते असं सांगून गेली. मात्र काही काळानंतर गावापासून 1 कि.मी. अंतरावर असलेल्या गावातीलच बोधाने यांच्या शेतातील विहिरीत दोघांचाही मृत्यूदेह तरंगत असल्याचा आढळला आहे.

घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना कळताच तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. तसंच शवविच्छेदनासाठी माय लेकाचा मृत्यूदेह मारेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलेा. आईने चिमुकल्या मुलासह जीवन संपवण्याचा निर्णय का घेतला, याबाबतची माहिती अद्यापपर्यंत मिळू शकलेली नाही. पुढील तपास पो.नि.जगदीश मंडलवार पो.उप.नि.अमोल चौधरी यांच्या मार्गदर्शनात मारेगाव पोलीस करत आहेत.

हेही वाचा - मुलाने चोरला 1 किलो गहू, वडिलांनी अशी दिली शिक्षा की सगळ्यांच्या डोळ्यात आलं पाणी!

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आपल्या पोटच्या चिमुकल्यांसह विवाहित महिला आत्महत्या करत असल्याचं प्रमाण वाढलं आहे. कौटुंबिक कलहातून असे प्रकार घडत असल्याचं पाहायला मिळत आहे.

Published by: Akshay Shitole
First published: August 9, 2020, 6:26 PM IST

ताज्या बातम्या