मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

यवतमाळ हादरलं! आई-बाबांची भीती दाखवून अल्पवयीन मुलीला दिल्या आयुष्यभराच्या जखमा

यवतमाळ हादरलं! आई-बाबांची भीती दाखवून अल्पवयीन मुलीला दिल्या आयुष्यभराच्या जखमा

जिल्ह्याच्या महागाव तालुक्यातील एका छोट्याशा गावात 11 वर्षाच्या विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आला. या घटनेने खळबळ उडाली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Yavatmal, India
  • Published by:  Kranti Kanetkar

यवतमाळ, 17 सप्टेंबर : जिल्ह्याच्या महागाव तालुक्यातील एका छोट्याशा गावात 11 वर्षाच्या विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आला. या घटनेने खळबळ उडाली. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह 4 जणांविरुद्ध महागाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

12 संटेंबर रोजी पीडित मुलीच्या आई वडील मजुरी करण्यासाठी शेतात गेले होते. तेव्हा अल्पवयीन मुलगी घरी एकटीच होती. दरम्यान यातील एका आरोपीने तिला घरी बोलावून आत घेऊन गेला व त्याच्या मित्रांनी दार लावून घेतले.

त्यानंतर नराधम आरोपीने अमानुष अत्याचार केला. या घटनेची कुठे वाच्छाता केली तर मारून टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे दोन तीन दिवस मुलीने या बाबत कोणालाही सांगितले नाही.

या घटने नंतर मुलीची प्रकृती बिघडली तेव्हा आई वडील तिला रुग्णालयात घेऊन गेले. मात्र दोन तीन दिवस झाले तरी प्रकृतीत सुधारणा झाली नाही. शिवाय मुलगी मनोरुग्णा सारखी वागत असल्याने तिला उपचारासाठी पुसद येथील रुग्णालय घेऊन गेले.

हेही वाचा-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, नागपुरात तरुणीवर वेळोवेळी अत्याचार

तेव्हा डॉक्टरांनी मुलीची बरकाईने चौकशी केली. तेव्हा तिने आई वडिलांना घडलेली घटना सांगितली. त्या नंतर पीडित मुलगी आणि आई वडील यांनी महागाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारी वरून चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला.

First published:

Tags: Crime news, Maharashtra News