विहिरीत कोसळलेल्या शेतकऱ्याला गंभीर जखम, उपचारादरम्यान सोडले प्राण

विहिरीत कोसळलेल्या शेतकऱ्याला गंभीर जखम, उपचारादरम्यान सोडले प्राण

या घटनेने परिसरातील शेतकरी वर्गात हळहळ व्यक्त केली जात आहे.

  • Share this:

यवतमाळ, 9 जुलै : यवतमाळ जिल्ह्याच्या बाभूळगाव तालुक्यातील गिमोना येथे एका 28 वर्षीय शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरातील शेतकरी वर्गात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. आदित्य सुधाकर खोडे असं मृत शेतकऱ्यांच नाव आहे.

आदित्य खोडे यांचं गिमोना शिवारात चार एकर शेत आहे. त्याने आपल्या शेतात आणि सोयाबीनची लागवड केली. मात्र आता शेतामध्ये तण मोठ्या प्रमाणात वाढले. त्यामुळे शेतात फवारणी सुरू होती. त्याच्या शेतात पाण्याची व्यवस्था नसल्याने फवारणीसाठी लागणारे पाणी बाजूच्या शेतकऱ्याच्या विहिरीतू आणावे लागते.

हेही वाचा - दौंड तालुक्यात नागरिकांच्या जीवाशी खेळ? MIDC तील दूषित पाणी ओढ्यात सोडले

त्यामुळे शेतकरी आदित्य सुधाकर खोडे पाणी काढण्यासाठी गेले असता तोल जाऊन विरीतीत कोसळले. त्याच्या ओरडण्याचा आवाज आल्याने मजुरांनी घटना स्थळाकडे धाव घेतली आणि त्याला बाहेर काढले. मात्र विहीर खोल असल्या कारणाने डोक्याला गंभीर इजा झाली. त्यामुळे त्याला उपचारसाठी बाभूळगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, शेतकऱ्याच्या या दुर्दैवी निधनानंतर परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी बाभूळगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.

Published by: Akshay Shitole
First published: July 9, 2020, 4:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading