यशवंत सिन्हा-नाना पटोले भेट; भाजपमध्ये मोदीविरोधकांची जमवाजमव

या भेटीत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. शिवाय येत्या काळात यशवंत सिन्हा, नाना पटोले, शत्रुघ्न सिन्हा आणि अरूण शौरी यांच्यात बैठक होणार असल्याचं सांगण्यात आलं.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Oct 15, 2017 10:40 PM IST

यशवंत सिन्हा-नाना पटोले भेट; भाजपमध्ये मोदीविरोधकांची जमवाजमव

नागपूर,10 ऑक्टोबर: पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात भाजपमधील नेत्यांची एकजूट होताना दिसते आहे. मोदींवर टीकेची तोफ डागणाऱ्या यशवंत सिन्हांची भंडाऱ्याचे खासदार नाना पटोले यांनी नागपूर विमानतळावर भेट घेतली. या भेटीत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. शिवाय येत्या काळात यशवंत सिन्हा, नाना पटोले, शत्रुघ्न सिन्हा आणि अरूण शौरी यांच्यात बैठक होणार असल्याचं सांगण्यात आलं.

भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा आणि भाजपचे भंडाऱ्याचे खासदार नाना पटोले यांची नागपूर विमानतळावर गुप्त बैठक झाली. नोटाबंदी, जीएसटी , शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी यासह वेगवेगळ्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. यशवंत सिन्हा आणि नाना पटोले यांच्या भेटीत शत्रृघ्न सिन्हा , अरुण शौरी अशी चौघांची नागपुरात लवकरच बैठक घेण्याचे ठरले असल्याची माहिती खासदार नाना पटोलेंच्या समर्थकांनी सांगितली आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेवरुन आपल्या लेखातून टीका करणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. आता राजशक्ती विरोधात लोकशक्ती उभारायची गरज आहे आणि त्याची सुरूवात अकोल्यातून करत आहोत असं सिन्हा म्हणाले. यशवंत सिन्हा हे माजी केंद्रीय अर्थमंत्री असल्याने त्यांच्या विधानांना गांभीर्याने घेतले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप खासदारांना बोलू देत नाही, मोदींना बोलणारी माणसं आवडत नाहीत असं म्हणत भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनीही थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तोफ डागली. हे दोन्ही नेते नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर नाराज आहेत. त्यामुळे या नेत्यांच्या नागपुरातील बैठकीला वेगळं महत्त्व आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 15, 2017 10:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...