हे वाचा-मोदींच्या 'मन की बात'नंतर अमृता फडणवीसांना ट्रोल्सचा फटका; ट्वीट करत म्हणाल्या.. अमृता फडणवीस यांचं 'तिला जगू द्या' गाणं नुकतंच प्रदर्शित झाल्यानंतर या व्हिडीओला 2 दिवसांत 10 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले. पण या गाण्याला ट्रोलर्सचा सामना करावा लागला. यापूर्वी अमृता फडणवीस यांचं महिलांच्या बाबतीतलंच गाणं गायलं होतं. अॅसिड हल्ल्यातील पीडित महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी हे गाणं त्यांनी गायलं होतं. अलग मेरा ये रंग है, मेरी खुदसेही जंग है असे या गाण्याचे बोल होते. अमृता फडणवीस यांच्या गाण्यावर निर्माता, दिग्दर्शक महेश टिळेकर यांनीही टीका केली आहे.सध्या विविध कारणांमुळे अमृता फडणवीस यांचं हे गाणं व्हायरल आहे. गाण्याचा आशय छान आहे.मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी जनजागृती महत्वाची आहे. माझ्या शुभेच्छा!!!https://t.co/m9Ygrg1K0z
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) November 19, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.