मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

..तर डोकं फोडीनं, लक्षात ठेवा! माजी मंत्री यशोमती ठाकूर यांचा व्हिडीओ व्हायरल, काय आहे प्रकरण?

..तर डोकं फोडीनं, लक्षात ठेवा! माजी मंत्री यशोमती ठाकूर यांचा व्हिडीओ व्हायरल, काय आहे प्रकरण?

माजी मंत्री यशोमती ठाकूर (Former Minster Yashomati Thakur) यांच्याकडून तिवसा तालुक्यातील (Tivasa Taluka) विविध कामांचे भूमिपूजन नुकतेच झाले. त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना उत्तम क्वॉलिटीचे काम झाले नाही तर तुमचे डोक फोडेन, असा दम दिला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

अमरावती, 25 जुलै : माजी मंत्री आणि आमदार यशोमती ठाकूर आपल्या चोख कामासाठी प्रसिद्ध आहेत. कुठल्याही सरकारी कामात चुक केलेली त्या खपवून घेत नाहीत. यामुळे अनेकदा सरकारी अधिकाऱ्यांनाही त्यांनी फैलावर घेतलं आहे. असाच एक प्रसंग त्यांच्या मतदारसंघात घडला आहे. तिवसा तालुक्यातील विविध रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच माजी मंत्री आणि आमदार यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी यशोमती ठाकूर यांनी लक्षात ठेवा मी तुमच्याकडून एक पैसाही घेत नाही. त्यामुळे कॉलिटीचे काम झाले नाही, तर मी तुमचे डोके फोडेन, असा दम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना दिला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय आहे घटना?

तिवसा तालुक्यात येणाऱ्या तिवसा वरुडा सुरवाडी मिर्झापूर निंभोरा बेलवाडी आणि आमदाबाद आदी ठिकाणी पुरामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीची यशोमती ठाकूर यांनी पाहणी केली. तसेच, या परिसरात रस्त्यांच्या कामासाठी 44 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. रस्‍त्‍याच्‍या कामाचे भूमिपूजन आटोपल्‍यावर यशोमती ठाकूर या सर्वांसमक्ष संबंधित रस्‍त्‍याचे काम कुणाकडे आहे, अशी विचारणा करतात. तेव्‍हा एक अधिकारी कनिष्‍ठ अभियंता म्‍हणून आपली ओळख सांगतो आणि हे काम आपल्‍याकडे आहे, असे सांगतो. त्‍याचवेळी अधिकाऱ्यांना उद्देशून यशोमती ठाकूर या रस्‍त्‍याच्‍या दर्जाच्‍या बाबतीत तडजोड स्‍वीकारली जाणार नाही, असे सांगतात. ‘मी एक रुपयाही घेत नाही, तुमच्‍याकडून ‘क्‍वालिटी’चे काम झाले नाही, तर डोके फोडीन लक्षात ठेवा’, असा इशारा त्‍या देतात. तिवसा मतदार संघात सिमेंट रस्त्याचे बांधकाम, इमारतींची दुरूस्‍ती अशा अनेक विकासकामांचे भूमिपूजन यशोमती ठाकूर यांच्‍या हस्‍ते झाले. त्‍यावेळी एका कार्यक्रमात हा प्रसंग घडल्‍याचे सांगितले जात आहे.

यापूर्वीही वादात

अधिकाऱ्यांना असं बोलण्याची यशोमती ठाकूर यांची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी पोलीस कॉन्स्टेबलवर हात उगारल्याप्रकरणी माजी मंत्री यशोमती ठाकूर यांना अमरावती न्यायालयाने तीन महिन्यांची शिक्षा सुनावली होती. 2012 मध्ये यशोमती ठाकूर यांनी अमरावती शहरात एका ट्रॅफिक पोलिसावर हात उगारला होता

पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये युतीची चर्चा झाली होती का? दीपक केसरकरांचा 'मातोश्री'ला थेट सवाल

24 मार्च 2012 रोजी अमरावतीमधल्या अंबादेवी मंदिराजवळ उल्हास रौराळे या पोलिसासोबत अॅड. यशोमती ठाकूर यांनी वाद घातला आणि मारण्याचा प्रयत्न केला. यशोमती ठाकूर तेव्हा आमदार होत्या. शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा गुन्हा त्यांच्यावर 2012मध्ये दाखल करण्यात आला होता.

First published:

Tags: Yashomati thakur