अमरावती 10 जुलै : अमरावतीचं वातावरण खराब करण्यात राणा दाम्पत्याचा हात असल्याचा आरोप माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे. उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणाचा राणा दाम्पत्याने इव्हेंट केला, असंही यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) म्हणाल्या. याशिवाय त्यांनी राणा दाम्पत्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातही राजकीय भूकंप; काँग्रेसला मोठा धक्का, 11 पैकी 10 आमदार भाजपसोबत जाणार?
राणा दाम्पत्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा, असा प्रकार आहेत. उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड राणा दाम्पत्याचा कार्यकर्ता होता, असा खळबळजनक दावा यशोमती ठाकूर यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर एकच खळबळ उडाली आहे. उमेश कोल्हे यांच्या हत्येचा कथित सूत्रधार इरफान खान याचे अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांच्याशी संबंध असल्याचं उघड झालं आहे, असंही त्या म्हणाल्या.
हनुमान चालीसा पठनावरूनही माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्पत्यावर जोरदार शाब्दिक हल्ला केला आहे. राणा दाम्पत्याकडून पब्लिसिटीसाठी सर्व गोष्टींचं राजकारण केलं जातं, असंही यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.
संजय राऊतांमुळेच शिवसेनेत उभी फूट? बंडखोर आमदार योगेश कदम यांचा गंभीर आरोप
यशोमती ठाकूर यांनी भाजपवरही निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, काँग्रेस पक्ष कधीही दहशतवादावर राजकारण करण्याच्या बाजूने नव्हता. मात्र आज जी परिस्थिती आहे त्यात एकापाठोपाठ एक घटनांमधून दहशतवादी आणि गुन्हेगार भाजपशी जोडले गेले आहेत. यावर प्रश्न विचारणं आवश्यक आहे. तुम्हीही विचार करा आणि समजून घ्या की, राष्ट्रवादाच्या नावाखाली भाजप देशाशी घृणास्पद खेळ करत आहे, असा गंभीर आरोप यशोमती ठाकूर यांनी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Navneet Rana, Yashomati thakur