भुसावळ 27 फेब्रुवारी : शहरातील इकबाल पहेलवान आखाड्यातर्फे बुधवारी खडकारोडवरील नवीन इदगाह मैदानावर खान्देश का महामुकाबला ही कुस्त्यांची दंगल झाली. कुस्त्यांचे अंतीम चार सामने सुरु असतानाच आयोजक तथा केळीचे व्यापारी आशिक सरदार बागवान (वय ५३) यांना हदयविकाराचा तिव्र झटका आला. त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.शहरातील इकबाल पहेलवान आखाड्यातर्फे बुधवारी खान्देश का महामुकाबला या कुस्त्यांचे सामने आयोजीत करण्यात आले होते. या सामन्यांसाठी राज्यासह देशभरातून नामांकित मल्ल आले होते. कुस्त्यांच्या सामन्यांचे मुख्य आयोजक नगरसेवक इकबाल सरदार बागवान यांचे लहान बंधू तथा केळीचे व्यापारी व आयोजक आशिक सरदार बागवान हे कुस्त्यांच्या आखाड्यातच नियोजन पाहत होते. मुख्य चार कुस्त्यांच्या लढतीमधील चौथ्या क्रमांकाची लढत सुरु झाल्यानंतर त्यांना आखाड्यात अस्वस्थ वाटू लागले.
भोवळ येत असल्याने ते आखाड्याबाहेर येवून जमिनीवर बसले. आयोजकांसह बागवान परिवारातील सदस्य व मित्रमंडळींनी त्यांना तत्काळ खडकारोडवरुन डॉ. मानवतकर हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने डॉ. राजेश मानवतकर ईसीजी, प्रथमोचार केले. मात्र तिव्र हदयविकार असल्याने त्यांचा मृत्यू झाला.
मात्र यानंतर पून्हा प्रयत्न म्हणून बागवान परिवारासह सचिन चौधरी, नगरसेवक दुर्गेश ठाकूर, रमेश चौधरी, युवा अंबोले आदींनी त्यांना उपचारार्थ गोदावरी हॉस्पीटलमध्ये दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच गोदावरी हॉस्पीटलमध्ये त्यांना मृत घोषित करण्यात आले. मृत आशिक बागवान यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, चार भाऊ, तीन बहिणी, वडील असा परिवार आहे.
भाजपच्या खासदार डॉ. हिना गावित अडकणार लग्नाच्या बेडीत
मित्राच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
कुस्तीचा अंतीम मुकाबला होण्यापूर्वी आखाडयावरच केक कापून वाढदिवस साजरा केला जाणार होता. मात्र तत्पूर्वीच आशिक बागवान यांचा हदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
कुस्तीगिरांवर दुख:चा डोंगर
भुसावळ शहरात प्रथमच बुधवारी मोठ्या प्रमाणात जंगी कुस्त्यांचा सामना हाजी इकबाल बागवान आखाड्याने आयोजन केले होते. जिल्ह्याभरातील नामांकित कुस्तीगिर व प्रेमी यावेळी उपस्थित होते. मात्र याच कार्यक्रमात आशिक सरदार बागवान यांच्या निधनामुळे दुख:चा डोंगर कोसळला.
मृत्यूच्या अर्धा तासापूर्वी मुलासह केला जल्लोष
कुस्त्यांच्या दंगलीत पहिल्या कुस्तीपासून आशिक बागवान हे त्यांचा पाच वर्षांचा मुलगा अली सोबत आखाड्यात होते. प्रत्येक कुस्तीनंतर त्यांनी आपल्या चिमुरड्या अलीसोबत कुस्तीचा जल्लोष केला. सुत्रसंचालनादरम्यान त्यांनी उपस्थितांचा गोंधळ कमी व्हावा यासाठी महिन्याभरातच पुन्हा मोठी कुस्त्यांची दंगल भरुन असेही सांगितले होते. मात्र जल्लोषानंतर अवघ्या अर्धाच तासात त्यांच्या मृत्यूच्या बातमीने उपस्थितानाच मोठा धक्का दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.