मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

WorldWilflifeDay : वाघ, हरीण, साळिंदर यांना असं एकत्र खेळताना कधी पाहिलंय का? यांच्या कुटुंबात आहेत हे सगळे सदस्य

WorldWilflifeDay : वाघ, हरीण, साळिंदर यांना असं एकत्र खेळताना कधी पाहिलंय का? यांच्या कुटुंबात आहेत हे सगळे सदस्य

या कुटुंबातली एक वर्षाची धिटुकली चक्क सापाशी खेळते आणि तिचा भाऊ हरणांना दूध पाजतो. बिबट्या, हरीण, साळिंदर, मोर अगदी तरसासारखे हिंस्त्र प्राणी या कुटुंबाचा एक भाग आहेत. जागतिक वन्यजीव दिनानिमित्त महाराष्ट्राला अभिमान असणाऱ्या या महान कुटुंबाची गोष्ट पाहा.

पुढे वाचा ...

मुंबई, 3 मार्च : महाराष्ट्राला अभिमान असणाऱ्या आणि राज्याचं नाव जगात मोठं कऱणाऱ्या काही मोजक्या लोकांमध्ये येते आमटे कुटुंब. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांनी जखमी आणि आजारी जंगली प्राण्यांसाठी सुरू केलं एक मदत केंद्र आणि त्यांचं हे आमटे अॅनिमल आर्क आज जगभरात नावाजलं गेलं आहेत. जगभरातले वन्यजीवप्रेमी आमटे कुटुंबीयांच्या या कामाकडे आदराने पाहतात. हिस्ट्री चॅनेलनं आमटेज अॅनिमल आर्कमधील काही भन्नाट प्रसंग चित्रित केले आहेत. आमटे यांच्या वन्यजीव अनाथालयाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल झाला आहे. आमटे कुटुंबातली छोटी मुलंसुद्धा कशी या जंगली प्राण्यांशी बिनधास्त खेळतात ते पाहा या व्हिडिओमध्ये...

1973 मध्ये प्रकाश आमटे हेमलकसामध्ये आले. इथल्या रहिवाशांसाठी काहीतरी करण्याची प्रकाश आमटे यांचे वडील आणि ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची इच्छा होती. डॉ. प्रकाश आमटे यांनी इथल्या आदिवासींना वैद्यकीय सेवा द्यायला सुरुवात केली आणि पाठोपाठ आसपासच्या जंगलातल्या जखमी प्राण्यांनाही आश्रय आणि उपचार द्यायला सुरूवात केली. एकदा काही आदिवासी एका माकडाला काठीवर उलटं टांगून नेताना डॉ. प्रकाश आमटे यांनी पाहिलं. त्यांनी आदिवासींना या जंगली जनावरांची हत्या करण्यापासून रोखलं आणि असे चुकून हातात सापडलेले जंगली प्राणी आपल्याकडे आणून द्यायची विनंती केली. त्यातूनच आमटेज अॅनिमल आर्कची सुरुवात झाली. डॉ. प्रकाश यांच्या या कामात पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे यांची पूर्णपणे सक्रिय साथ लाभते आहे. एवढंच नाही, तर प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांची पुढची पिढी आणि त्यांची मुलंदेखील या प्राण्यांना कुटुंबाचा हिस्सा मानतात. एक वर्षांची आमटे यांची नात बिनधास्त सापाशी खेळते, नातू हरणाला दूध पाजतो आणि ते सगळे एकत्र खेळतातही. हिंस्र जनावरांनाही प्रेमाने आपलं करणाऱ्या प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांची दखल म्हणूनच जागतिक स्तरावर घेतली गेली आहे. आजच्या जागतिक वन्यप्राणी दिनानिमित्त महाराष्ट्राच्या या लाडक्या कुटुंबाला आणि त्यांचा महान कामाला सलाम!

First published:

Tags: Hemalkasa, Prakash amte, Worl wildlife day, जागतिक वन्यजीव दिवस