बुलडाण्याच्या मोनाली जाधवने जगात वाढली महाराष्ट्राची शान, दोन सुवर्णांसह तीन पदकांची कमाई

बुलडाण्याच्या मोनाली जाधवने जगात वाढली महाराष्ट्राची शान, दोन सुवर्णांसह तीन पदकांची कमाई

मोनाली जाधव हिने तिरंदाजीमध्ये विक्रमी कामगिरीची नोंद केली.

  • Share this:

अमोल गावंडे, बुलडाणा, 22 ऑगस्ट : चीनमध्ये झालेल्या जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील मोनाली जाधवने विक्रम करत दोन सुवर्णांसह एकूण तीन पदकांची कमाई केली आहे. भारतीय पोलीस दलाचे प्रतिनिधीत्व करत असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील जलंब पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत महिला कॉन्स्टेबल

मोनाली जाधव ही 2013 मध्ये पोलीस दलात भरती झाली असून ती बुलडण्यामधील आनंद नगर येथील राहवासी आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळाडू असलेली मोनाली जाधव सध्या जलंब पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत आहे. चीनच्या चेंगडू येथे 8 ते 18 ऑगस्ट दरम्यान जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धा झाल्या. यामध्ये मोनालीने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधलं.

मोनाली जाधवने फिर्ल्ड आर्चरीमध्ये सुवर्ण, तर 'थ्रीडी' आर्चरी प्रकारात कास्य पदक मिळवले. मोनालीने याआधी मे महिन्यात शांघाय येथे झालेल्या विश्व स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करत जागतिक स्तरावर नववे स्थान मिळविले होते. मोनाली जाधवला तिरंदाजी प्रशिक्षक चंद्रकांत इलग,सुरेश शिंदे यांचे मार्गदर्शन, तसेच पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे प्रोत्साहन मिळाले. मोनालीच्या या यशाबद्दल बुलडाणा जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.दिलीप भुजबळ पाटील यांनी त्याचे अभिनंदन केले. तर बुलडाणा जिल्ह्यातून मोनालीवर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.

मोनालीची संघर्षगाथा

बुलडाण्यासारख्या साधारण शहरात आणि गरीब कुटुंबात राहणारी मोनाली बारावीत असताना तिच्या वडिलांचे अपघाती निधन झाले. घरातील कमावता पुरुष गेल्याने सर्व जबादारी आईवर आली. आईला मदत व्हावी आणि मोनालीचे शिक्षण पूर्ण व्हावे, यासाठी मोनालीच्या मोठ्या भावाने आपले शिक्षण बंद करून मजुरी करायला सुरुवात केली. आई आणि भाऊ मजुरी करून आपला प्रपंच चालवत होते. हे पाहत असताना कुटुंबासाठी आपणही मदत करावी. अशी भावना मोनालीच्या मनात येत होती आणि त्याच वेळी महाराष्ट्र पोलीसची भरती निघाली. खेळात लहानपणापासूनच आवड असल्याने मोनालीने पोलीस भरती प्रक्रिया यशस्वीरीत्या पास करून ती बुलडाणा पोलीस शिपाई म्हणून भरती झाली.

सैन्यदलातून निवृत्त होऊन महाराष्ट्र पोलीसमध्ये भरती झालेले चंद्रकांत तिलक यांनी मोनालीच्या खेळाडू वृत्ती पाहून तिला तिरंदाजीबद्दल मार्गदर्शन केले. प्रशिक्षक चंद्रकांत तिलक यांच्या मार्गदर्शनात मोनालीने खेळायला सुरुवात केली. विविध स्पर्धा खेळण्यासाठी तिच्या पोलीस विभागाने देखील पाठीशी उभे राहत रजा मंजूर केली आणि त्यानंतर मात्र मोनालीचा खरा प्रवास सुरू झाला. ज्यामध्ये मोनालीने विभाग ते राष्ट्रीय स्तरावर आपल्या प्रशिक्षकांचे डावपेच आणि कुशल बुद्धिमत्तेने प्रथम क्रमांक पटकावत अनेक पदकांची कमाई केली.

VIDEO : 'राज ठाकरेंच्या बाबतीत अनुचित प्रकार घडला तर आम्ही...', मनसे नेत्याचा थेट इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: buldhana
First Published: Aug 22, 2019 04:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading