Home /News /maharashtra /

देवाक् काळजी रं... हातावर पोट असणाऱ्यांचे हाल, मजुरांनी पायीच धरला घरचा रस्ता

देवाक् काळजी रं... हातावर पोट असणाऱ्यांचे हाल, मजुरांनी पायीच धरला घरचा रस्ता

भारतात जवळपास 500 हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. धक्कादायक म्हणजे कोरोनानं भारतात 11 बळी घेतला आहे.

पालघर, 25 मार्च: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. पण हातावर पोट असणाऱ्या सर्वसामान्य जनतेला मात्र मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. पालघर जिल्ह्यातील अनेक आदिवासी बांधव हे विटभट्टीवर गुजरात राज्यातील भिलाड येथे कामानिमित्त स्थलांतरित झाले होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर सर्व कामाना ब्रेक लागला आहे. परिणामी मजुरांनी आपल्या घरचा रस्ता धरावा लागला आहे. लॉकडाऊनच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवा चालू असल्याने साधारणपणाने 70 ते 80 नागरिक भिलाडमध्येच अडकले आहेत. यात लहान मुले व स्रियांसह संपूर्ण कुटुंब तेथे अडकले आहे. आता घरी जायचं कसं, असा प्रश्न त्यांना पडला आहे. अखेर भिलाड ते चारोटी हे 40 ते 45 किलोमीटर अंतर पायी चालत जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला आहे. लॉकडाऊन केल्यानंतर सद्यस्थितीला फक्त अत्यावश्यक सेवा चालू आहेत. सर्व हॉटेल्स बंद असल्याने वाटेत उपाशीपोटी त्यांचा प्रवास चालू आहे. पोटाला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, डोक्यावर ऊन, पायात चप्पल नाही अशा परिस्थितीत घर गाठायाचेसे? हा प्रश्न त्यांना सतावू लागला आहे. एका बाजूला कोरोना सारख्या भयंकर आजाराची भीती आणि दुसऱ्या बाजूला हा जीवघेणा प्रवास अशा दुहेरी कात्रित हे नागरिक सापडले आहेत. सोबत लहान मुले भुकेने व्याकुळ होऊन रडत असल्याने लवकरात लवकर घरी पोहचायचे हा एकच निर्धार करून हे आदिवासी बांधव पायपिट करत निघाले आहेत. रस्त्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा हे आदिवासी बांधव करत आहेत. हेही वाचा..होम क्वारन्टाइन झाल्यानंतर कुटुंबाने लढवली शक्कल, थेट छतावर मांडला क्रिकेटचा डाव दरम्यान, कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. 21 दिवस म्हणजेच 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन असणार आहे. पुढचे 21 दिवस कुणालाही घराबाहेर पडता येणार नाही. रस्त्यांवरून विना आयडी फिरणाऱ्यांवर आणि विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. देशात अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्याचे निर्देश केंद्राकडून देण्यात आले आहेत. दुसरीकडे, राज्यात दिवसभरात कोरोनाचे तब्बल 15 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 122 वर पोहोचली आहे. मुंबईमध्ये 5 आणि ठाण्यात एक रुग्ण आढळून आला आहे. दिवसभरात राज्यात कोरोनाव्हायरसचे एकूण 15 रुग्ण आढळून आलेत. सकाळी सांगलीमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं . राज्यावर असलेल्या कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी लोकांना दिलासा देण्याचाही प्रयत्न केला आहे. 'जीवनाश्यक वस्तूंची दुकाने उघडे असतील. कोणत्याही वेळा नसणार आहेत. भाजीपाल्याची दुकाने बंद होणार नाहीत. कृपया गर्दी करू नका,' असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. हेही वाचा...जावई शिंकला, सासरच्या मंडळींनी थेट घराबाहेर खांबाला बांधला! धक्कादायक VIDEO कोरोनाच्या संकटामुळे अनेक अडचणी येत असल्या तरीही आता तुम्ही सर्व घरी आहात. घरात बसून कुटुंबियांसोबत आनंद घ्या,' असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केलं. तसंच मी घरात बसून काय करतो, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मी घरी मिसेस मुख्यमंत्र्यांचं ऐकतो, तुम्हीही तुमच्या होम मिनिस्टरचं ऐका, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.जगभरात आतापर्यंत 18 हजार लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. तर लाखो लोकांवर सध्या उपचार सुरू आहेत. भारतात जवळपास 500 हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. धक्कादायक म्हणजे कोरोनानं भारतात 11 बळी घेतला आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Palghar

पुढील बातम्या