VIDEO मध्ये पाहा चक्क SPऑफिससमोर झाडावर चढून महिलेनं केलं 'शोले' स्टाईल आंदोलन

VIDEO मध्ये पाहा चक्क SPऑफिससमोर झाडावर चढून महिलेनं केलं 'शोले' स्टाईल आंदोलन

सासरची मंडळी आपल्या दीड वर्षाच्या मुलीस ताब्यात देत नसल्यानं एका मातेला टोकाचं पाऊल उचलावं लागलं.

  • Share this:

जळगाव, 30 जुलै: सासरची मंडळी आपल्या दीड वर्षाच्या मुलीस ताब्यात देत नसल्यानं एका मातेला टोकाचं पाऊल उचलावं लागलं. महिलेनं थेट पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरील एका झाडावर चढून आत्महत्येचा प्रयत्न करत 'शोले' स्टाईल आंदोलन केलं. महिलेला झाडावरून खाली उतरवण्यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. अखेर दीड तासांनी महिलेस खाली उतरवण्यात पोलिसांना यश आलं आहे.

हेही वाचा..गुप्तांगातून स्वॅब घेणे प्रकरण: शिवसेना व एमआयएम नगरसेवक आक्रमक, हॉस्पिटसमध्ये राडा

जळगाव कौटुंबिक वादातून एका विवाहितेने गुरूवारी दुपारी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर एका झाडावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. पतीच्या ताब्यात असलेली लहान मुलीचा ताबा आपल्याकडे मिळावा आणि सासरच्या लोकांवर कायदेशीर कारवाई करावी या मागणी साठी एका विवाहितेंन पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच असलेल्या झाडावर चढत सिनेस्टाईल 'विरुगिरी' केली. या आधीही या महिलेने औषधी गोळ्यांचे सेवन करत आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचं नातेवाईकांनी सांगितलं.

अश्विनी पंकज पाटील ही जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यातील विरवाडा गावातील महिला आहे. तिचा विवाह पुण्यातील पंकज पाटील यांच्यासोबत गेल्या चार वर्षे पूर्वी झाला होता. मात्र, विवाहनंतर पती-पत्नीमध्ये वाद होऊ लागल्याने पतीने अश्विनीला घरातून मारहाण करत काढून दिल्याचं तिचं म्हणणं आहे. या घटनेचा पार्श्वभूमीवर अश्विनी हिनं पुणे येथे पोलिसांत तक्रार दिली होती. मात्र तरीही पती आणि सासरच्या लोकांकडून मानसिक आणि शारीरिक त्रास होतच राहिल्याने अश्विनी यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मात्र, झाल्या प्रकारात त्यांची दीड वर्षाची मुलगी पतीकडेच असल्याने अश्विनीला तिचा विरह सहन होत नाही आहे. मुलीचा ताबा मिळण्यासाठी आता अश्विनीची धडपड सुरू आहे. मात्र, प्रकरण न्यायालयात गेल्याने पोलिसही या घटनेत हतबल होऊन मुलीचा ताबा मिळेनासा झाल्याने आलेल्या नैराश्यातून सदर महिलेने चक्क झाडावर चढून मुलीचा ताबा मिळावा, यासाठी आंदोलन केलं. सासरच्या लोकांवर कारवाई व्हावी, ही मागणी लावून धरली पोलिसांनी कारवाई न केल्यास आपण झाडावरच गळफास घेऊ किंव्हा वरून उडी मारून आत्महत्या करू अशी धमकी अश्विनी देत होती.

हेही वाचा..कोरोना टेस्टसाठी तरुणीच्या गुप्तांगामधून घेतलं स्वॅब, भाजप नेत्या संतापल्या

पोलिसांना तिला उतरविण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. सासरच्या लोकांवर कारवाईच आश्वासन पोलिसांनी अश्विनी पाटील यांना दिल्यावर सदर महिला झाडावरून उतरली असली तरी कारवाईच्या मागणीसाठी आता तिनं जिल्हापेठ पोलिसांत ठिय्या मांडला आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: July 30, 2020, 5:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading