मजुरांची छुपी वाहतूक करणाऱ्या पिकअपचा भीषण अपघात, महिला जागीच ठार, 7 जखमी

मजुरांची छुपी वाहतूक करणाऱ्या पिकअपचा भीषण अपघात, महिला जागीच ठार, 7 जखमी

पालघर जिल्ह्यामधील डहाणू-चारोटी मार्गावर वाडीत काम करणाऱ्या महिला कामगारांना वाहून नेणाऱ्या पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला आहे.

  • Share this:

पालघर, 1 एप्रिल: पालघर जिल्ह्यामधील डहाणू-चारोटी मार्गावर वाडीत काम करणाऱ्या महिला कामगारांना वाहून नेणाऱ्या पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका महिलेचा जागेवरच मृत्यू झाला असून सात महिला जखमी झाल्या आहेत. रेणूका लहांगे असं मृत महिला मजुराचं नाव आहे. जखमी महिलांवर कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हेही वाचा..पोलिसांच्या वेशभूषेत प्रॅंक व्हिडिओ बनवणं पडलं महागात, चार जणांवर गुन्हा दाखल

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सर्व महिला विक्रमगड तालुक्यातील तलावली येथील रहिवासी आहेत. त्या डहाणू तालुक्यातील वाढणान येथील मिरचीच्या वाडीत कामाला आल्या होत्या. कामावरून परतत असताना रानशेत येथे हा अपघात झाला. अपघात एवढा भीषण आहे की, एका महिलेचा जागेवरच मृत्यू झाला तर सात महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

हेही वाचा...कोरोनाला हरवणं शक्य आहे! व्हेंटिलेटरवर राहिलेल्या महिलेनं सिद्ध केलं

जखमी महिलांना कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी पाच महिलांची प्रकृती चिंताजनक आहे.

रंजना लिलका, चुनवंती वनगा, मंजुळा हरवटे, कमला हरवटे, गंगी हरवटे, गुलाब सातवी आणि सुनंदा हरवटे अशी जखमी महिलांची नावं आहेत.

दरम्यान, कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे. लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडू नका, घरातच राहा, अशा सूचना केंद्र आणि राज्य सरकारकडून दिले जात आहे. तरी देखील काही लोक जीव धोक्यात टाकत आहेत.

हेही वाचा.. कोरोनाच्या आधी ही साथ थांबवा! Whatsapp वरच्या दाव्यांना डॉक्टरांनी दिलेली उत्तरं

गुजरातच्या दिशेनं पायी जाणाऱ्या 5 प्रवाशांचा चिरडले

विरारमधून गुजरातच्या दिशेनं पायी घरी जाणाऱ्या 7 प्रवाशांचा मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विरार हद्दीत भीषण अपघात झाला होता. यात 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

हे सर्व प्रवाशी सध्या देशात संचारबंदी सुरू असल्याने आपल्या घरी गुजरातच्या दिशेने जात असताना गुजरात कडील हद्द बंद असल्यानं त्यांना परत पाठवण्यात आलं होतं. परत वसईच्या दिशेनं येत असताना महामार्गावरील विरार हद्दीत भारोल परिसरात एका भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर टेम्पोने यांना जोरदार धडक दिली आहे. ही धडक इतकी भीषण होती की, यात तिघे जण हे ट्रकच्या चाकाखाली सापडले गेले. त्यामुळे चेंदामेंदा होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

First published: April 1, 2020, 6:49 PM IST

ताज्या बातम्या