VIDEO : बुरखाधारी महिला चोरांची स्टाईल पाहुन पोलिसही झाले थक्क!

VIDEO : बुरखाधारी महिला चोरांची स्टाईल पाहुन पोलिसही झाले थक्क!

ही टोळी महिला म्हणून येत असली तरी त्यातले काही पुरुष असल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत आहे.

  • Share this:

मुजीब शेख, नांदेड 7 जानेवारी : नांदेड शहरातील जुना मोंढा या कापड बाजारात सध्या महिला चोरांच्या टोळीने धुमाकुळ घातला आहे. बुरखाधारी महिलांची एक टोळी ग्राहक म्हणून येते आणी महागड्या कपडयांची चोरी करुन निघुन आते. महिलांच्या चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. ही टोळी महिला म्हणून येत असली तरी त्यातले काही पुरुष असल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत आहे.

रविवारी जुना मोंढा परीसरातील साई टेक्सटाईल्स या दुकानात तीन बुरखाधारी महिला ग्राहक आल्या होत्या. या पैकी एका महिलेने दुकान मालकाला बोलण्यात व्यस्त ठेवले. अन्य दोघींनी कपडे पाहण्याचं नाटक सुरु केलं. संधी मिळताच यातील एका महिलेने आठ साड्या असलेले एक बंडल शिताफीने घेतलं आणि आपल्या बुरख्यात दडवून ठेवलं.

नंतर काहीच खरेदी न करता या महिला दुकानातुन निघुन गेल्या. नंतर साड्यांचे बंडल कमी दिसत असल्याने दुकानदाराला चोरीचा संशय आला. सीसीटीव्हीतली दृष्य तपासल्यानंतर दुकानदाराला चोरीचा उलगडा झाला. यापुर्वी याच परीसरातील अनेक दुकानात अशाच पद्धीतीने अनेक चोऱ्या झाल्याची माहिती आता पुढे येत आहे.

महिलांची ही टोळी फक्त महागडे कपडे चोरत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगीतले. यापुर्वी देखील अनेकवेळा कपडे चोरणा-या या महीला टोळी बाबत तक्रारी  झाल्या. पण नांदेड पोलिसांना मात्र या टोळीचा सुगावा काही लागलेला नाही त्यामुळे व्यापारी त्रस्त असल्याची माहिती दुकानदार प्रवीण काळे यांनी दिली आहे.

First published: January 7, 2019, 8:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading