शिवाजी गोरे (प्रतिनिधी)
दापोली, 28 ऑक्टोबर: सासू खेकसली, या क्षुल्लक कारणावरून एका महिलेनं आपल्या दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी दापोली पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे. सिद्धी प्रथमेश लाड (वय-28), मुलगा प्रणित (वय-3) आणि स्मित (वय-1) अशी मृत मायलेकांची नावं आहेत
हेही वाचा..भयंकर! 'त्या' हत्येचं गूढ उकललं, अनैतिक संबंधातून सूनेनंच केला सासूचा खून
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील सोवेली या गावातील सिद्धी प्रथमेश लाड (28 वर्ष) महिलेने आपल्या दोन लहान मुलांसह गावातल्याच विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद दापोली पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक हिरेमठ यांनी दिली आहे.
सिद्धीनं एवढं टोकाचं पाऊल का उचललं?
27 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे आठ वाजण्याच्या दरम्यान सिद्धी ही मुलगा प्रणित आणि मुलगी स्मित या दोन मुलांना घेऊन घरातून निघून गेली होती. नातेवाईकांची तिचा शोध घेतला. मात्र, ती कुठेही आढळून आली नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी सोवेली वाकण या जंगल परिसरात पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत सिद्धीसह तिच्या दोन्ही मुलांचे मृतदेह आढळून आले.
दुधाच्या तांब्यावरून खेकसली होती सासू...
दरम्यान, सासू दोन दिवसांपूर्वी दुधाच्या तांब्यावरून सिद्धीवर खेकसली होती. याचाच राग मनात धरून ती आपल्या मुलासह घरातून निघून गेली होती आणि तिनं आत्महत्या केली, अशी माहिती सिद्धीचे पती प्रथमेश लाड यांनी दापोली पोलिसांना दिली.
हेही वाचा..मुंबईत हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट, 3 मुलींची सुटका तर 'बंटी-बबली'ला ठोकल्या बेड्या
दरम्यान, सिद्धीचा स्वभाव चिडखोर स्वरूपाचा होता. किरकोळ कारणावरून ती वाद घालत होती, असंही पतीनं सांगितलं आहे. परंतु सिद्धी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं, अशा प्रश्न देखील तिच्या नातेवाईकांना पडला आहे.
आपल्या दोन लहान चिमुकल्यांसह विवाहितेनं आत्महत्या केल्याच्या घटनेनं पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. सिद्धी लाड यांच्या माहेरच्या नातेवाईक काय भूमिका घेतात, यावर पोलिसांच्या तपासाची दिशा ठरणार आहे.