• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • 'नवीन गाडीच पाहिजे', सासरच्या छळाला कंटाळून पिंपरीत महिलेची आत्महत्या

'नवीन गाडीच पाहिजे', सासरच्या छळाला कंटाळून पिंपरीत महिलेची आत्महत्या

सततच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळलेल्या स्नेहाने अखेर टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.

 • Share this:
  पिंपरी चिंचवड, 5 डिसेंबर : नवीन गाडी पाहिजे, यासारख्या विविध मागण्या करत सासरच्या व्यक्तींनी केलेल्या छळामुळे विवाहितेने आत्महत्या केली आहे. स्नेहा क्षीरसागर असं गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या 31 वर्षीय महिलेचं नाव आहे. आपल्या माहेरहून फ्लॅटसाठी पैसे ,बाळंतपणाचा खर्च तसंच नवीन गाडीसाठी पैसे घेऊन यावे, यासाठी स्नेहा क्षीरसागर या महिलेला सासरी त्रास दिला जात होता. सततच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळलेल्या स्नेहाने अखेर टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. हुंड्यासोबतच सासरी स्नेहाच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला त्रास दिला जात होता. याप्रकरणी स्नेहाच्या वडिलांनी स्नेहाच्या पतीसह सासू आणि सासरा यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली. त्यानंतर पिंपरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्नेहाला हुंड्यासाठी त्रास देण्यात कुटुंबातील नक्की कोण कोण सामील होतं, तसंच तिला शारिरीक आणि मानसिक त्रास देण्यात आला होता का, याबाबत पोलीस आता अधिक तपास करत आहेत. हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथेमुळे आजच्या काळातही एका महिलेला जीव गमावावा लागला आहे. त्यामुळे ही प्रथा समाजातून पूर्णपणे नष्ट कधी होणार, असा सवाल आता सजग नागरिकांकडून करण्यात येत आहे. VIDEO VIRAL : लाजिरवाणी घटना; वळुला जीवंत जाळण्याचा प्रयत्न
  First published: