बीडमध्ये महिलेचा प्रताप! प्रतिष्ठित व्यक्तीशी लग्न करून उकळले लाखो रुपये

बीडमध्ये महिलेचा प्रताप! प्रतिष्ठित व्यक्तीशी लग्न करून उकळले लाखो रुपये

महिलेनं घरातील सोन्याचे पाच लाखांचे दागिने, रोख दीड लाख रुपये आणि दोन लाख रुपयांच्या साड्या, कपडे असा ऐवज घेऊन पोबारा केला. जवळपास नऊ लाखांना या महिलेने संबंधित व्यक्तीला गंडा घातला.

  • Share this:

बीड, 11 एप्रिल : परिस्थितीमुळे अनेकदा पन्नाशीच्या पुढील ज्येष्ठांना भावनिक आधाराची गरज असते. समाजातील अशाच प्रतिष्ठित व्यक्तीला जाळ्यात ओढून त्याच्याशी लग्न करायचे आणि नंतर लाखो रुपयांना गंडा घालायचा, असे अनेक प्रकार आपण पाहत असतो. बीडमध्येही नुकताच असा एक प्रकार घडला आहे. या प्रकरणी गेवराई पोलिसांत महिला आणि तिचे कुटुंबीय अशा 8 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

बीड जिल्ह्यातल्या गेवराई परिसरात गेल्या काही दिवसांत ही घटना घडली आहे. याठिकाणी असलेल्या एका 51 वर्षीय व्यक्तीच्या पत्नीचे काही महिन्यांपूर्वी निधन झालं होतं. त्यांना एक मुलगा, एक मुलगी असून दोघंही विवाहित आहेत. तसंच या व्यक्तीला नातवंडंही आहेत. पण तसं असलं तरी आयुष्यातला एकटेपणा दूर करण्यासाठी म्हणून त्यांनी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला. दुसरं लग्न करण्यासाठी म्हणून त्यांनी औरंगाबादच्या एका वधू-वर सूचक मंडळामध्ये नाव नोंदणीही केली. याठिकाणी या संबंधित व्यक्तीची ओळख औरंगाबाच्या वैजापूर तालुक्यात शिऊर बंगला येथील ज्योती शेळके हिच्याशी झाली. लग्नासंदर्भात त्यांच्यामध्ये संवादही झाला.

वाचा - 5 महिन्यांनंतर कबरीतून बाहेर काढावा लागला मृतदेह, न्यायालयानं का दिला असा आदेश?

यानंतर ज्योतीच्या कुटुंबातील सदस्य म्हणजे ज्योतीची आई कमलबाई, भाऊ सागर शेळके यांच्यासह ज्योतीच्या दोन बहिणी त्यांचे पती हे सर्व गेवराईला या व्यक्तीच्या घरी गेले. या सर्वांनी ज्योती आणि या व्यक्तीचा विवाह जमवला. त्यानुसार त्यांना विवाहदेखिल झाला. पण लग्नानंतर काही दिवसांतच ज्योतीच्या कुटुंबीयांकडून संबंधित व्यक्तीला पैशाची मागणी होऊ लागली होती. या प्रकारानंतर एक दिवस संबंधित व्यक्ती कामानिमित्त बाहेरगावी गेलेले होते. त्यावेळी ज्योतीनं घरातील सोन्याचे पाच लाखांचे दागिने, रोख दीड लाख रुपये आणि दोन लाख रुपयांच्या साड्या, कपडे असा ऐवज घेऊन पोबारा केला. जवळपास नऊ लाखांना या महिलेने संबंधित व्यक्तीला गंडा घातला. महाराष्ट्रदेशा या वेबसाईटनं याबाबत वृत्त दिलं आहे.

वाचा - LIVE VIDEO: भररस्त्यात पत्नीला चाकूनं भोसकलं, 45 पेक्षाही जास्त वार करत हत्या

गावाहून परतल्यानंतर या व्यक्तीला त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनंतर त्यांनी गेवराई पोलीस ठाण्यात त्याच्या दुसऱ्या पत्नीसह तिच्या माहेरच्या इतर सात व्यक्तींच्या विरोधात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदर महिलेने इतरही काही लोकांना अशा प्रकारे गंडा घातला आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

Published by: News18 Desk
First published: April 11, 2021, 6:12 PM IST

ताज्या बातम्या