Home /News /maharashtra /

आता प्रत्येक जिल्ह्यात महिला पोलीस स्टेशन, महिलांसाठी ठाकरे सरकारची मोठी घोषणा

आता प्रत्येक जिल्ह्यात महिला पोलीस स्टेशन, महिलांसाठी ठाकरे सरकारची मोठी घोषणा

अजित पवारांनी आज ठाकरे सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडला. यात प्रत्येक जिल्हात महिला आयोगाच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली आहे.

    मुंबई,06 मार्च: महाविकास आघाडी सरकाराच्या वतीने अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (6 मार्च) विधिमंडळात अर्थसंकल्प सादर केला. महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात महिलांच्या सुरक्षेवर अधिक भर देण्यात आला आहे. राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढत असतानाच अर्थसंकल्पात महिला सुरक्षेसाठी तसेच महिला सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न करण्याचं आश्वासन अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. अजित पवारांनी शुक्रवारी ठाकरे सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. यात महिलांच्या सुरक्षेवर अधिक भर देण्यात आला आहे. महिलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात पोलीस स्टेशन उभारले जाणार असल्याची घोषणा अजित पवारांनी यावेळी केली. विशेष म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये सर्व अधिकारी आणि कर्मचारी या महिलाच असतील, अशी महत्त्वाची घोषणा देखील अजित पवार यांनी केली. महिलांवर होणारा अन्याय, अत्याचार रोखण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. महिलांलवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हा महत्वाचा निर्णय घेण्यात आल्याचं अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलं. त्यामुळे महिला अत्याचाराच्या घटना कमी होणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. प्रत्येक जिल्ह्यात महिला आयोगाचं कार्यालय स्थापन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ठाकरे सरकार महिला सक्षमीकरणासाठी विशेष योजना राबणार असल्याचं अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. यंदा महिला धोरणाला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. महिला बचत गटांना उभारी देण्यासाठी त्यांच्याकडून एक हजार कोटी रुपयांची उत्पादन खरेदी करणार असल्याचं यावेळी अजित पवारांनी म्हटलं आहे. महिला अत्याचाराच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होते आहे. 2018 मध्ये महिलांवर अत्याचाराच्या 35,497 घटना घडल्या होत्या तर 2019 मध्ये याचं प्रमाण वाढलं आहे. गेल्या वर्षी महिला अत्याचारात वाढ होऊन 37,567 महिला अत्याचाराच्या घटनासमोर आल्या आहेत. 2019 मध्ये 5412 महिलांवर बलात्कारच्या घटनांची नोंद झाली आहे. महिला अपहरणाच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. त्यामुळे आता या नव्या घोषणांची अंमलबजावणी होणं अधिक महत्वाचं आहे. हे वाचा: केंद्रावर टीका पण गडकरींचे मानले आभार, अर्थसंकल्पात अजित पवारांची गुगली पुणेकरांच्या ट्राफिकची चिंता मिटणार, अर्थसंकल्पात सरकारने घेतला मोठा निर्णय
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Maharashtra budget, Maharashtra news, Maharashtra news cm, Maharashtra police

    पुढील बातम्या