कलेक्टर ऑफिसमध्ये पोलीस कर्मचारी महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, हे आहे कारण

कलेक्टर ऑफिसमध्ये पोलीस कर्मचारी महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, हे आहे कारण

बीड जिल्हाधिकारी कार्यालयात एका महिला पोलीस कर्मचारीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मनीषा काटे असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे. पोलीस दलातील हजेरी मेजरच्या त्रासाला कंटाळून महिला पोलीस कर्मचारीने हे टोकाचे पाऊल उचलले.

  • Share this:

बीड, 25 एप्रिल- बीड जिल्हाधिकारी कार्यालयात एका महिला पोलीस कर्मचारीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मनीषा काटे असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे. पोलीस दलातील हजेरी मेजरच्या त्रासाला कंटाळून महिला पोलीस कर्मचारीने हे टोकाचे पाऊल उचलले.

मनीषा काटे यांना सातत्याने एकच ड्युटी देण्यात येत होती. महिला आणि तिचे कुटुंब मागील चार दिवसांपासुन प्रशासनाला निवेदन दिले होते. मात्र, बदली होत नसल्याने महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांनी दिली. सदर महिला पोलीस कर्मचाऱ्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील पोलीस दलात एकच खळबळ उडली आहे. तसेच या गंभीर प्रकरणावर वरीष्ठ पोलीस अधिकारी काहीही बोलण्यास तयार नाहीत.

मौत का कुऑं! स्टंटमननं जवळून पाहिला मृत्यू, थरारक घटनेचा LIVE VIDEO

First published: April 25, 2019, 2:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading