फेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना

फेसबुकवरुन झालेली मैत्री तिच्या जिवावर बेतली, पुण्यातील धक्कादायक घटना

फेसबुकवरुन झालेली मैत्री पुण्यातील एका महिलेला जिवावर बेतली आहे. फेसबुकवर मित्र बनलेल्या एका महिलेची दागिन्यांच्या हव्यासापोटी निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

पुणे, 15 जुलै- फेसबुकवरुन झालेली मैत्री पुण्यातील एका महिलेला जिवावर बेतली आहे. फेसबुकवर मित्र बनलेल्या एका महिलेची दागिन्यांच्या हव्यासापोटी निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राधा अगरवाल (वय-40) असे हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आनंद निकम (वय-31) याला अटक केली आहे. दोन लाख रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी राधाची हत्या केल्याचे आनंदने कबूल केले आहे.

काय आहे हे प्रकरण?

पुण्यातील रेंज हिल्स भागात आनंद निकमचा चहाचा स्टॉल आहे. आनंदने चार महिन्यांपूर्वी राधा हिला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. राधाने त्याची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. नंतर दोघांमध्ये मैत्री झाली. मैत्री वाढत गेल्याने दोघांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. राधा ही श्रीमंत घरातील असल्याचे आनंदला माहीत होते. त्यात आनंदच्या डोक्यावर दोन लाख रुपयांचे कर्ज होते. आनंदचा राधाच्या दागिन्यांवर डोळा होता. कर्ज फेडण्यासाठी तिच्याकडून दागिने चोरावे, असा त्याचा प्लान होता.

वर्षा विहारासाठी आपण ताम्हिणी घाटात फिरायला जाऊ आणि फोटो सेशन करु, असे आनंदने राधाला सांगितले. विशेष म्हणजे फोटो चांगले यावेत यासाठी अंगावर भरपूर दागिणे घालून ये, असेही आनंदने तिला सांगितले होते. राधानेही आनंदवर विश्वास ठेवून 22 जूनला राधा हिच्या स्कूटरवरुन दोघे पुण्यापासून 75 किलोमीटर अंतरावर असलेल्या ताम्हिणी घाटात गेले. तिथे पोहोचल्यावर आनंदने राधाचे फोटो काढायला सुरुवात केली. वेगळे फोटो काढण्याच्या बहाण्याने राधाचे हात झाडाला बांधले आणि डोळ्यावर पट्टी बांधली. यानंतर त्याने चाकूने राधाचा गळा कापला. राधाच्या अंगावरील असलेले दागिणे घेऊन तो पसार झाला.

कॉल रेकॉर्डवरून लागला छडा...

राधा बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या 19 वर्षांच्या मुलाने मुंढवा पोलिस स्टेशनमध्ये केली. पोलिसांनी राधाचा कॉल रेकॉर्डची माहिती मिळवून तपास सुरू केला असता तिने शेवटचा फोन आनंद निकमला केल्याचे समोर आले. पोलिसांनी आनंदचा शोध घेतला. पोलिसांनी 11 जुलै रोजी त्याला ताब्यात घेतले. आनंदच्या घरातून राधाचा मोबाइल आणि स्कूटर सापडली. आनंदने दिलेल्या माहितीनुसार ताम्हिणी घाटातून राधाचा मृतदेह 12 जुलैला पोलिसांनी ताब्यात घेतला.

First published: July 15, 2019, 10:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading