नाशिक, 12 नोव्हेंबर: कोरोना पार्श्वभूमीवर आलेली यंदाची दिवाळी नियम व अटींच्या बंधनात साजरी करावी लागत आहे. मात्र, नाशिकमध्ये ही सर्व बंधनं झुगारल्याचं चित्र सद्या दिसत आहे. दुसरीकडे, दिवाळीची खरेदी नाशिककरांना चांगलीच महागात पडते आहे.
कारण नाशिक शहरात आता महिला गॅंग अर्थात महिला चोराची टोळी सक्रीय झाली आहे. याच गर्दीचा फायदा घेत बाजारपेठेत चोरटे आपले हात साफ करून घेत आहे. गर्दीचा गैरफायदा घेत काही महिलांच्या टोळ्याही सक्रिय झाल्या आहेत. त्यांना रोखण्यासाठी पोलिसही रस्त्यावर उतरले आहेत.
हेही वाचा...सोमैय्यांच्या डोक्यावर परिणाम, एहसान फरामोश माणूस; शिवसेना नेत्यानं सोडला 'बाण'
गुरूवारी संध्याकाळी नाशिक शहरातील नरोड परिसरात एका दुकानातून महिलेच्या पर्समधून 20 हजार रुपयांची रोकड एका महिलेनं लांबवली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. मात्र, वाढत्या गुन्हेगारीवर आळा बसवण्यात पोलिस अपयशी ठरले आहेत.
प्रचंड गर्दिनं भरलेली बाजारपेठ... जागोजागी सुरू असलेले सेल... कपडे, वस्तू, साहित्य, मिठाई खरेदीसाठी उडालेली झुंबड... असं सद्या नाशिक शहरातील चित्र आहे. मास्कचा वापर करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असली तरी सोशल डिस्टंसिंगचा पार फज्जा उडाला आहे. याच परिस्थितीचा गैरफायदा काही गुन्हेगारी वृत्तीच्या महिला घेत आहेत.
महिलांच्या पर्स लांबवल्या जात आहेत. पुरुषांचं पाकीट गायब होत आहे. पैसेच नाही तर नागरिकांचे साहित्यही चोरीला जात आहे. अशा घटनांमध्ये शहरात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता पोलिसांनीही कंबर कसली आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीसही रस्त्यावर उतरले आहेत.
नाशिक पोलिसांनी आता इनव्हिजिबील पोलिसिंग सुरू केलं आहे. सिव्हिल ड्रेसमध्ये अनेक पुरुष आणी महिला कर्मचारी दिवाळीच्या गर्दीत मिसळून फिरत आहे. संशयास्पद महिला असो की पुरुष, त्यांना तातडीनं ताब्यात घेण्यात येत आहे. याचा फायदा होत असला तरी गर्दीत घडणारे लुटीचे गुन्हे सुरूच आहे. प्रत्येक नागरिकांनंही गर्दीत फिरतांना जागरूक असावं, असं पोलीस आवाहन करताना दिसत आहे.
हेही वाचा..धुळे-सुरत महामार्गावर कोंडाईबारी घाटात भीषण अपघात, कार पुलावरून कोसळून 3 ठार
गुन्हेगारांना पोलीस पकडतीलच. मात्र, शहरातील गुन्हेगापी रोखण्यासाठी नागरिकांची साथ महत्त्वाची असल्याचं पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी 'News18 लोकमत' शीसोबत बोलताना सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Maharashtra, Nashik