आजारी असूनही लावली निवडणूक ड्युटी, महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू

आजारी असूनही लावली निवडणूक ड्युटी, महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू

आजारी असूनही निवडणूक ड्युटी लावली. यात प्रीती लोकेश आत्राम-धुर्वे यांचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झालाय. प्रीती आत्राम यांच्या नातेवाईकांनी प्रशासनावर गंभीर आरोप केलेय.आपल्याला कावीळ झालाय. रजा मिळावी, यासाठी प्रीती लोकेश यांनी विनंती अर्ज केला होता. पण तो अर्ज स्वीकारला नाही.

  • Share this:

प्रफुल्ल साळुंखे (प्रतिनिधी)

मुंबई, 11 मे- आजारी असूनही निवडणूक ड्युटी लावली. यात प्रीती लोकेश आत्राम-धुर्वे यांचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झालाय. प्रीती आत्राम यांच्या नातेवाईकांनी प्रशासनावर गंभीर आरोप केलेय.आपल्याला कावीळ झालाय. रजा मिळावी, यासाठी प्रीती लोकेश यांनी विनंती अर्ज केला होता. पण तो अर्ज स्वीकारला नाही. प्रीती यांची निवडणूक ड्युटी लावण्यात आली. प्रीती या ऑन ड्युटी असताना त्यांची तब्बेत अधिक खालावली. त्यांना कस्तुरबा त्यानंतर नायर हॉस्पिटसमध्ये दाखल करण्यात आले. अखेल शनिवारी प्रीती यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. पोलीस याबाबत गुन्हा दाखल करून घेत नसल्याचा आरोप नातेवाईक करताय.

निवडणूक आयोगाला कुठलेही पत्र दिलं नाही..

प्रीती लोकेश आत्राम यांनी निवडणूक आयोगाला कुठलीही पत्र दिलं नाही, असा खुलासा डेप्युटी कलेक्टर बाळासाहेब वाकचौरे यांनी केला आहे. प्रीती लोकेश यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख झाल्याचेही बाळासाहेब वाकचौरे यांनी सांगितले.बाळासाहेब वाकचौरे यांनी सांगितले की, आम्हाला किमान 50 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी प्रकृतीबाबत अर्ज केला होता. त्यांना रिलिव्ह करून त्या जागा पर्यायी नियुक्ती करण्यात आली. प्रीती यांचा अर्ज असता तर त्यांच्याबाबत वेळी दखल घेण्यात आली असती. प्रीती आजारी असल्याचं त्यांनी सांगितलं, त्याच वेळी त्यांना घरी जाण्यासाठी गाडी देण्यात आली. पण त्यांनी फक्त स्टेशनला सोडावी, अशी विनंती केली होती. त्यानंतर त्यांचं उपचार दरम्यान मृत्यू झाल्याचे ऐकून दुःख झालं.

प्रीती लोकेश यांच्या कुटुंबियांना 15 लाखांची मदत

प्रीती लोकेश यांच्या कुटुंबियांना 15 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी याबाबत निवडणूक आयोगाला प्रस्ताव पाठवला आहे. कर्तव्यावर असताना निधन झाल्याने ही मदत जाहीर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

SPECIAL REPORT: लग्नाआधीच सलमान खान होणार 'बाबा'?

First published: May 11, 2019, 12:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading