मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

धक्कादायक, महिलांना लागलंय 'माती' खाण्याचं व्यसन

धक्कादायक, महिलांना लागलंय 'माती' खाण्याचं व्यसन

औरंगाबाद परिसरातल्या महिलांमध्ये एक अजब व्यसन आढळून आलं आहे, हे व्यसन आहे माती खाण्याचं. हे प्रमाण एवढे अधिक आहे की वर्षभरात 10 ते 12 टन माती महिलांनी फस्त केल्याचं आढळून आलं आहे.

सिद्धार्थ गोदाम, ता. 13 जुलै : व्यसन व्यक्तीला कशाचेही असू शकते, खास करून व्यसनाचे प्रमाण पुरुषांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. औरंगाबाद परिसरातल्या महिलांमध्ये एक अजब व्यसन आढळून आलं आहे, हे व्यसन आहे माती खाण्याचं. हे प्रमाण एवढे अधिक आहे की वर्षभरात 10 ते 12 टन माती महिलांनी फस्त केल्याचं आढळून आलं आहे.

औरंगाबाद शहरातील एका महिलेला गेल्या 15 वर्षांपासून माती खाण्याची सवय आहे. सुरवातीला खडू पेन्सिल खाण्याची सवय लागली आणि आता त्याचं रूपांतर चक्क व्यसनात झालं आहे. आता या चक्क माती खातात. दिवसातून मातीचे तीन ते चार पाकीटं त्या फस्त करतात. म्हणजेच जवळपास 30 ते 40 ग्राम माती त्या खातात. माती खाण्याची सवय यांना एवढी लागलीय की माती खायला नाही मिळाली तर त्यांना चिडचिड होते.

आंबे वक्तव्य भोवलं, संभाजी भिडे दोषी !

VIDEO : तब्बल 12 तासानंतर 'डर'चा 'दी एण्ड',मुंबईच्या माॅडेलची सुटका

ही माती खास करून गुजरात आणि राजस्थानहून येते. विशिष्ट प्रकारची ही माती भट्टी मध्ये भाजून ती देशभरात पाठवली जाते. या मातीमध्ये कॅल्शियम ची मात्रा अधिक असते असा समज महिलांमध्ये आहे आणि ज्या महिलांमध्ये कॅल्शियम आणि लोह चे प्रमाण कमी आहे अशाच महिलांना ही माती खाण्याची इच्छा होते असेही सांगितले जाते. ही माती खाणाऱ्या महिला ग्राहक एवढ्या जास्त आहेत की गल्ली बोळातील किराणा दुकानावरही ही माती सहज उपलब्ध असते. या पाकिटांची किंमतही एक ते दोन रुपये एवढी असल्याने त्याची तडाखेबंद विक्री होत आहे.

चोराचा प्रामाणिकपणा, दागिने परत करून मागितली माफी

आठवण निळू फुलेंची : 9 वा स्मृती दिन

माती खाणे पूर्णपणे अशास्त्रीय आहे. कारण मातीमध्ये अन्न घटक नाहीत. त्यामुळे माती खाणाऱ्या महिलांना शारीरिक त्रास आणि तिच्या होणाऱ्या बाळावर परिमाण होऊ शकतो असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

प्रिया दत्तनं दिलं संघाला प्रत्युत्तर, म्हणाल्या, माझा भाऊ आहे रोल माॅडेल!

या मातीत बॅक्टेरिया असण्याची शक्यता असते. त्याची कसलीही तंत्र शुद्ध तपासणी होत नाही. शरीरातील लोह आणि कॅल्शियम ची मात्र वाढवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधी आणि गोळ्या हा पर्याय आहे. मात्र माती खाणे हा पर्याय असू शकत नाही असंही डॉक्टरांनी स्पष्ट केलंय.

First published:

Tags: Aurangabad, Women, महिला