रायचंद शिंदे, शिरुर, 20 एप्रिल- कोरेगाव भिमा येथे राहत्या घरात महिलेचा मृतदेह आढळुन आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. महिलेची हत्या झाल्याचा सशंय व्यक्त केला जात आहे.
प्रियंका प्रधान (वय-21) असे मृत महिलेचे नाव आहे. महिला मुळची ओरिसा राज्यातील आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास प्रियांका राहत असलेल्या घरातुन दुर्गंधी येऊ लागल्याने खळबळ उडाली. शेजारील नागरिकांनी पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांना घरात प्रवेश केल्याने घरात तरुण महिलेचा मृतदेह आढळून आला. या महिलेचा मृत्यू २-३ दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दरम्यान, या तरुण महिलेची हत्या पतीनेच केल्याचा संशय देखील पोलिसांनी व्यक्त केला आहे. शिक्रापूर पोलीस तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Koregaon bhima, Pune, Shirur, Women dead body