मोबाईलला हात लावला म्हणून नवऱ्याने पाडले पत्नीचे 4 दात, रॉकेल टाकून पेटवण्याचाही प्रयत्न

मोबाईलला हात लावला म्हणून नवऱ्याने पाडले पत्नीचे 4 दात, रॉकेल टाकून पेटवण्याचाही प्रयत्न

जागतिक महिला दिनच्या (8 मार्च) पूर्वसंध्येला कौटुंबिक हिंसाचाराची धक्कादायक घटना समोर आल्या आहेत.

  • Share this:

बीड,7 मार्च: जागतिक महिला दिनच्या (8 मार्च) पूर्वसंध्येला कौटुंबिक हिंसाचाराची धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. बीड जिल्ह्यात कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण 40 टक्क्यांवरून 60 टक्क्यांवर पोहोचले आहे. मोबाईलला हात लावला म्हणून नवऱ्याने पत्नीचे चार दात पाडले. एवढंच नाही तर रॉकेल टाकून तिला पेटवून देण्याचाही प्रयत्न केला. तर कुठे प्रेमविवाह केला म्हणून आई-वडिलच मुलीच्या जीवावर उठले आहेत.आत्महत्येच्या दारातून महिलांना आधार देणाचे काम 'स्वाआधारगृह' करत आहे. कोटुंबिक हिंसाचार पीडित महिलांनी 'News18 लोकमत'कडे आपली व्यथा मांडली आहे.

हेही वाचा...चुकूनही करु नका महिलेच्या सौंदर्याची तारीफ, खावी लागेल तुरुंगाची हवा

'मोबाईलला हात लावला म्हणून नवऱ्याने पाडले चार दात, हात पाय मोडायचा प्रयत्न केला. एकदा तर रॉकेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. कशीबशी वाचले. प्रेमविवाह केला आई-वडील सुखाने जगू देत नाहीत. नवऱ्याने घरातून हाकलून दिल्यानंतर आत्महत्येचा विचार डोक्यात आला होता. ही व्यथा इथेच संपत नाहीत. समाजात अशा अनेक अत्याचार पीडित महिला आहेत. या महिलांना आधार आणि धीर देण्याचे काम 'स्वाआधारगृह' करत आहे. महिलांच्या फाटलेल्या आयुष्याला टाके घालण्याचे काम स्वआधारगृहात केले जाते आहे. एवढेच नाही तर त्महत्येच्या दारातील या महिलांना जगण्याची नवी उमेद देऊन परिस्थितीशी लढण्यासाठी बळ दिले जात आहे.

हेही वाचा...शिक्षिकेनेच काढले चिमुकलीला चिमटे, मुंबईतल्या Preschoolमधला धक्कादायक प्रकार

महिला, मुलीचे स्वतंत्र अस्तित्व आणि कर्तुत्व मान्य न होणारी मानसिकता समाजामध्ये मोठ्या प्रमाणात बळावत आहे. खोट्या प्रतिष्ठेत जगण्याचा अट्टहास करणाऱ्या कुटुंबामध्ये महिलेचा छळ होण्याचे प्रमाण गेल्या पाच वर्षांत 45 टक्‍क्‍यांवरून 60 टक्क्यांवर पोहोचले असल्याचे विदारक सत्य समोर आले आहे. बीड जिल्ह्यातील कौटुंबिक हिंसाचाराच्या शिकार बनलेल्या महिलांसाठी काम करणाऱ्या बनसारोळा विकास मंडळाच्या समुपदेशकांनी मागील 25 वर्षे केलेल्या कामासह पाहणीतून ही बाब समोर आली. धक्कादायक म्हणजे कुटुंबात केवळ सासू-सुनेवरच अन्याय, अत्याचार होतो असे नाही, तर जन्मदात्या आई-वडिलांनीकडूनही अल्पवयीन मुलींचा छळ केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या आणि नव्याने आयुष्य जगण्यासाठी धडपडणाऱ्या महिला, मुलींनी समस्येचा पाढा वाचला. तेव्हा अंगावर काटा उभा राहिला.

हेही वाचा..तुम्हालाही येतो का फोन केल्यावर खोकल्याचा आवाज? काय आहे त्यामागचं कारण

'मुलीच्या वाढदिवसाचे फोटो पाहण्यासाठी मोबाईलला हात लावला म्हणून नवऱ्याने काठीने मारहाण करत चार दात पडले. रक्तबंबाळ अवस्थेत कशीबशी दवाखाण्यात गेली. गेल्या अनेक वर्षांपासून सासू आणि नवरा त्रास देतात, मात्र सहन करते आजही त्यांनी चांगले सांभाळावे मी नांदायला द्यायला तयार आहे, अशी व्यथा एका 21 वर्षे पीडितेने व्यक्त केली. तिला दोन अपत्ये आहेत.

अल्पवयात लग्न झालं आठवत नाही. आईवडिलांची गरीब परिस्थिती लग्न लावून दिलं नवरा मारहाण करतो म्हणून बाहेर काढलं. पुन्हा माहेरच्यांनी समजूत काढून सासरी पाठवलं. मात्र नवर्‍यांचा त्रास वाढला. अक्षराचा हात-पाय मोडण्याचा प्रयत्न केला. एकदा तर त्याने अंगावर रॉकेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. चार लेकराला घेऊन पळ काढत पोलीस स्टेशन गाठलं. स्वाआधारगृहामध्ये काम करून मुलांचे शिक्षण करून जगत आहे.'

हेही वाचा..Birthday Special : बॉलिवूड पदार्पणाआधीच लव्ह लाइफमुळे चर्चेत राहिली होती जान्हवी कपूर

'नवऱ्याचं दुसरं लग्न आहे, हे माहीत नव्हतं. काही दिवस सुखाचा संसार केला. मात्र नंतर नवरा दुसऱ्या बायकोला घेऊन आला. यातच भांडणं सुरू झाली. नंतर नवऱ्याने मला घरातून हाकलून दिलं. आईवडिलांकडे जाता येत नव्हतं. उलट चारित्र्यावर संशय म्हणून माझ्यावर त्याने दाग लावण्याचा प्रयत्न केला जात होता. अशावेळी जीव द्यावा, असं वाटत होतं. मात्र जीव दिला तर बाहेरचे संबंध असल्याने जीव दिला, असे नाव ठेवतील म्हणून कसाबसा स्वाआधारगृह गाठलं आणि आज या ठिकाणी चांगलं जीवन जगत आहे.'

हेही वाचा..हेमा मालिनींनी सांगितली लेकीची अनटोल्ड स्टोरी, सतर्कतेमुळे वाचली इशा देओल

ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून बीडची ओळख आहे. शिक्षणाचा अभाव, कुटुंबाची खोटी प्रतिष्ठा, बळावलेली संशयी वृत्ती आणि महिलांचे स्वतंत्र आयुष्य मान्य नसणे, यासारख्या अनेक कारणांमुळे कुटुंबातील महिला स्वतःला असुरक्षित समजत आहेत. आतापर्यंत सासू-सुनांची भांडणे किंवा सुनेचा सासरी होणारा छळ या घटना अधिक प्रमाणात घडत होत्या. मात्र, 'सैराट' प्रेमप्रकारणामुळे आता पोटच्या मुलीचा देखील आई-वडिलांनी छळ केल्यामुळे अल्पवयीन पीडित मुली स्वाआधारगृहामध्ये वास्तव्य करत आहेत. 17 वर्षाची पीडिता प्रियकरासोबत बंगळुरुला पळून गेली होती. त्या ठिकाणी एक अपत्य झालं. प्रियकरासोबत सुखाने संसार सुरू असताना आई-वडिलांनी पोलीस स्टेशन तक्रार दिली. पोलिसांनी बंगळुरु येथून बीडमध्ये घेऊन आले. आईवडील सुखाने जगू देत नाहीत, अशी तक्रार हे पीडितेने केली आहे.

हेही वाचा..1 एप्रिलपासून बदलणार PAN, आयकर आणि GST संदर्भातील नियम, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

अत्यंत क्षुल्लक कारणावरून वाद, आत्महत्येपर्यंत गेलेली भांडण यासह अनेक गंभीर घटनांमधील पीडित महिला या स्वाधारगृहात वास्तव्य करत आहेत. इच्छेविरुद्ध लग्न लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या आई-वडिलांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर हाकलून दिलेली अल्पवयीन पीडिताही याच स्वाआधारगृहात वास्तव्यास आहे.

क्षुल्लक कारणावरून महिलांवर होणारे अत्याचाराचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अत्याचार पीडित महिलांना आधार देण्याचं काम स्वाधारगृह करत असल्याचे वरिष्ठ समुपदेशक उमेश होमकर, समुपदेशक उषा जाधव यांनी सांगितल.

गेल्या पंचवीस वर्षांपासून बनसारोळा विकास मंडळ ही संस्था महिलांच्या प्रश्नांवर काम करते. तुटलेले संसार पुन्हा उभे करण्यासाठी विशेष मार्गदर्शन या मंडळाच्यावतीने केले जाते.केंद्र शासनाच्या तुटपुंज्या मानधनावर ही संस्था चालते. या गृहात कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडितांना आधार देऊन त्यांचे पूनर्वसन केले जाते. कौटुंबिक हिंसाचारात शहरी आणि ग्रामीण असा फरक उलट सुशिक्षित कुटुंबात प्रमाण जास्त आहे असे काही महिला समोर येतात. तर काही आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात, असे या स्वाधारगृहाच्या अधीक्षक आशा धनवडे यांनी सांगितलं.

या संस्थेमध्ये आलेल्या तीन हजार तक्रारी पैकी तब्बल 80 टक्के तक्रारी या महिलांच्या संदर्भामध्ये होत्या. 20 टक्के या पुरुष या संदर्भामध्ये होत्या. यामध्ये संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार 100 कुटुंबांमधील 60 टक्के कुटुंबात महिला ह्या कौटुंबिक हिंसाचाराने पिडीत असतात काही महिला समोर येतात. तर बाकीच्या महिला या सहन करत जीवाचं बरं-वाईट करतात. यामुळे महिला दिन साजरा करत असताना कौटुंबिक हिंसाचाराकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.

First published: March 7, 2020, 1:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading