बेळगाव, 30 ऑक्टोबर : बेळगावात नगरसेविकेन अनोख आंदोलन केलं आहे. हाय मास्ट दिव्याच्या खांबावर चढून बेळगाव मनपा वॉड क्रमांक 41च्या नगरसेविका सरला हेरेकर यांनी हे अनोखं आंदोलन केलं आहे. यात मात्र पोलिसांची भंबेरी उडाली. चक्क महिला नगरसेविकेला खांबावर चढलेलं पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. त्यांच्या प्रभाग क्रमांक 41मध्ये विकास झाला नाही. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत कोट्यावधी रुपये मंजूर झाले असले तरी अधिकारी आपल्या वॉर्डात जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत असा आरोप करत नगरसेविका सरला हेरेकर या विद्युत खांबावर चढल्या होत्या. पोलिसांनी एक तास विनंती करत त्यांना अखेर खाली उतरवले.