महाबळेश्वर, 06 मार्च : महाबळेश्वरमध्ये महिलेने विहिरीत उडी मारून आत्महात्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. घटनेची माहिती मिळताच ट्रेकर्सने विहिरीत उड्या घेत महिलेला वाचवलं आहे. आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या या महिलेला जिवंत बाहेर काढण्यात यश आलं आहे.
वैशाली मिसाळ असं महिलेचे नाव आहे. घरगुती कारणांमुळे विहिरीत उडी मारून आत्महात्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. पण वेळीच महिलेला ट्रेकर्सनी बाहेर काढल्यामुळे महिलेचा जिव वाचाला. ही घटना आहे साता-यातील महाबळेश्वरमधली.
वैशाली मिसाळ यांनी घरगुती वादातून घराजवळील विहिरीत उडी मारली. ही बाब नातेवाईकांच्या निदर्शनास येताच त्यांनी मोठ्याने ओरडण्यास सुरुवात केली. तर काहींनी ट्रेकर्सना फोन केले. घटनास्थळी साहित्यासह पोचलेल्या ट्रेकर्सनी धडाधड विहिरीत उड्या मारल्या.
संबंधित महिला पाण्यात पूर्ण बुडाली होत्या, मात्र ट्रेकर्सनी त्यांना वरती काढलं. सुरुवातीला वैशालींचा मृत्यू झाला असंच सर्वांना वाटत होतं. मात्र विहिरीतून वरती काढताच त्यांचा श्वास सुरू झाला. त्यांना अर्ध बेशुद्धावस्थेतच शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
वैशाली यांची तब्बेत सुधारत आसल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे. उपस्थितांनी मात्र महाबळेश्वर ट्रेकर्स आणि सह्याद्री ट्रेकर्स कार्यकर्त्यांचे आभार मानले. दरम्यान, या प्रकरणात पोलिसही अधिक तपास करत आहे.
आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल वैशाली यांनी का उचललं याची सध्या पोलीस चौकशी करत आहेत. त्यासाठी पोलीस वैशाली यांच्या कुटुंबीयांचीही चौकशी करणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.
व्हाॅट्सअॅपवर पाठवला पाॅर्न VIDEO, गुजराती व्यक्तीला महिलेनं चपलेनं फोडलं