Home /News /maharashtra /

''केतकी चितळेला वेड्याच्या रुग्णालयात दाखल करा, उपचाराचा खर्च NCP करेल''; राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

''केतकी चितळेला वेड्याच्या रुग्णालयात दाखल करा, उपचाराचा खर्च NCP करेल''; राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

आज पुन्हा नवी मुंबईतील (Navi Mumbai protest) राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी केतकी चितळेच्या आक्षेपार्ह पोस्टचा निषेध केला.

    नवी मुंबई, 16 मे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार (NCP leader Sharad Pawar) यांच्याबद्दल अभिनेत्री केतकी चितळेने (Actress Ketki Chitale) सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट (Offensive Post) केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते (NCP leaders and activists) भलतेच भडकले आहेत. आज पुन्हा नवी मुंबईतील (Navi Mumbai protest) राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी केतकी चितळेच्या आक्षेपार्ह पोस्टचा निषेध केला. यावेळी घणसोली राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने कोपरखैरणे पोलीस ठाण्यात निवेदन देऊन केतकी चितळेला अटक करण्याची मागणी केली. तसेच यावेळी केतकी चितळेच्या फोटोला जोडे मारो आंदोलन देखील करण्यात आले. केतकी चितळेला वेड्याच्या रुग्णालयात दाखल करा, तिच्या उपचाराचा खर्च राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल, असं महिला कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीच्या महिलांनी केतकीच्या फोटोला पोलीस ठाण्यासमोर जोडे मारले. केतकी चितळेच्या तोंडाला फासलं काळं, राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांचा दणका दोन दिवसांपूर्वी ठाणे पोलिसांनी केतकी चितळेला (ketaki chitle) अटक केली. पोलीस तिला घेऊन जात असताना राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी तिच्या तोंडाला काळं फासलं. शरद पवार यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केल्याने तिच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तिला नवी मुंबई येथून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. केतकी चितळे हिला कळंबोली पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. तिला एका रुममध्ये बसून ठेवण्यात आले होते. त्यानंतर केतकीला कळवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ठाणे पोलीस जेव्हा केतकीला घेऊन जात होते त्यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत केतकीवर शाईने काळं फासलं. केतकीची पोस्ट नेमकी काय आहे ? अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत अतिशय खालच्या भाषेत लिहिलं आहे. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेली ही पोस्ट असल्याचंही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. केतकीने 'तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक.. अशी कविता पोस्ट केली होती.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: NCP, Sharad Pawar (Politician)

    पुढील बातम्या