धक्कादायक घटना! महिलेनं व्हॉट्सअ‍ॅप कॉल करून तरुणाचा शूट केला Nude Video

धक्कादायक घटना! महिलेनं व्हॉट्सअ‍ॅप कॉल करून तरुणाचा शूट केला Nude Video

एके दिवशी महिलेनं तरुणाला व्हिडीओ कॉल करून न्यूड होण्यास सांगितलं.

  • Share this:

मुंबई, 30 ऑगस्ट: महिलेनं एका 25 वर्षीय तरुणाला व्हॉट्सअ‍ॅप कॉल करून त्याचा Nude Video शूट केला. नंतर त्याला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत 37 हजार रुपयांना गंडवल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा...E-Pass न मिळाल्यानं वेटरची आत्महत्या? हॉटेलमध्ये कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

ठाणे जिल्ह्यातील भायंदर भागात ही घटना घडली आहे. अज्ञात आरोपी महिलेनं 25 वर्षीय तरुणाला व्हॉट्सअ‍ॅप कॉल करून त्याचा Nude Video शूट करून त्याला ब्लॅकमेल केलं. न्यूड व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी वसूल केली.

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भयंदर परिसरात राहणाऱ्या पीडित तरुणाला गेल्या महिन्यात एका अज्ञात महिलेनं व्हॉट्सअ‍ॅप कॉल केला. नंतर संबंधित महिला ही तरुणाला वारंवार कॉल करू लागली. एके दिवशी महिलेनं तरुणाला व्हिडीओ कॉल करून न्यूड होण्यास सांगितलं. महिलेनं नकळत तरुणाचा न्यूड व्हिडीओ रेकॉर्ड करून घेतला. दुसऱ्या दिवशी तरुणाला त्याचा न्यूड व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याला 50 हजार रुपयांची खंडणी मागितली.

पीडित तरूण एका खासगी संस्थेत नोकरी करतो. आरोपी महिला वारंवार कॉल करून तरुणाला पैशांसाठी धमकावत होती. पैसे दिले नाही तर सुरतमध्ये (गुजरात) न्यूड व्हिडिओ व्हायरल करेन, अशी महिला धमकी देत होती. फोन करणाऱ्या महिलेनं स्वत:ला सीबीआय एजेंट सांगितलं होतं.

हेही वाचा...जेव्हा अचानक पोलीस येतात! रेव्ह पार्टी करणाऱ्या डझणभर तरुण-तरुणींना अटक

कोरोना काळात वर्क फॉर्म होम करणाऱ्या पीडित तरुणानं आरोपी महिलेला 37 हजार रुपये दिले. आरोपी महिलेच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणानं अखेर या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: August 30, 2020, 9:46 PM IST

ताज्या बातम्या