Home /News /maharashtra /

चार जणांच्या हत्येचे आरोप, 20 लाखांचं बक्षीस असणाऱ्या नक्षलवादी तरुणीचं आत्मसमर्पण; लग्नासाठी पत्करली शरणागती

चार जणांच्या हत्येचे आरोप, 20 लाखांचं बक्षीस असणाऱ्या नक्षलवादी तरुणीचं आत्मसमर्पण; लग्नासाठी पत्करली शरणागती

नक्षलवादी कारवायांमध्ये सामील असलेल्या एका महिलेनं गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण (Surrender) केलं आहे.

    गडचिरोली, 20 जून : भारतात नक्षलवादी (Naxalites) संघटनांकडून नेहमीच सरकार आणि पोलिसांविरोधात (Police) रोष व्यक्त करण्यात येतो. टोकाच्या संघर्षामुळे अनेकदा चकमकी घडतात. यात अनेक नक्षलवाद्यांना आणि पोलिसांना आपला जीव गमवावा लागतो. नक्षलवाद्यांमध्ये महिलांचाही समावेश असतो. अशाच नक्षलवादी कारवायांमध्ये सामील असलेल्या एका महिलेनं गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण (Surrender) केलं आहे. सविता उर्फ गंगा नारोटी असं या महिलेचं नाव आहे. वयाच्या 13 व्या वर्षी ही महिला नक्षलवादी कारवायांमध्ये सामील झाली होती. लहानपणीच आई-वडिलांचं छत्र हरवल्यामुळे ती काकांकडे राहत होती. अंतर काकांनी तिचं लहानपणीच लग्न लावून देण्याचा प्रयत्न केल्यामुळे तिनं नक्षलवादी संघटनांकडे वळली होती. हे वाचा -Job Alert: ठाणे महानगरपालिकेत 'या' पदासाठी नोकरीची संधी; त्वरित करा अप्लाय जांभुळखेडा चकमकीत सहभाग जांभुळखेडा चकमकीमध्ये तब्बल 15 पोलिसाना आपले प्राण गमवावे लागले होते. या चकमकीमध्ये सविताचा समावेश होता. तसंच तिच्यवर तब्बल चार जणांच्या हत्येचा आरोप आहे. त्यामुळे पोलिसांनी तिच्यावर तब्बल दोन लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं. लग्नासाठी पत्करली शरणागती नक्षली कारवाईदरम्यान सविताचं एका तरुणावर प्रेम जडलं. मात्र तिचा नक्षली भूतकाळ तिच्या प्रेमाच्या आड येत होता. म्हणून तिनं पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Gadchiroli, Naxal Attack

    पुढील बातम्या