भिवंडी, 21 जून- अत्याचाराला विरोध करणाऱ्या महिलेची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी तरूणाला तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, 23 वर्षीय पीडित महिला भिवंडी तालुक्यातील राहनाळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत एका चाळीत राहात होती. ती घरात एकटी असताना संधी साधून आरोपी निखील संजय कडू(वय-20) या तरुणाने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिने अत्याचाराला प्रतिकार केला असता त्याने रागाच्या भरात धारदार चाकूने तिच्यावर सपासप वार केले. यात महिलेचा जागेवरच मृत्यू झाला. या हत्येप्रकरणी नारपोली पोलिसांनी अवघ्या 10 तासांत निखील कडू आरोपीला अटक केली आहे.
गाडीला साईड न दिल्याच्या वादातून घाटकोपरमध्ये तरुणाची हत्या
गाडीला साईड न दिल्यावरून झालेल्या वादातून घाटकोपरमध्ये एकाची हत्या करण्यात आली होती. घाटकोपर येथील साईनाथनगरात बुधवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. गणेश म्हस्के (वय-25) असं मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेली माहिती अशी की, गणेश मध्यरात्री साईनाथ नगर येथील एका छोट्या रस्त्यावरून बाईकने येत होता. याचवेळी समोरून एक कार आली. कारमध्ये चार जण बसले होते. चौघांनी गणेशला त्याची बाईक मागे घेण्यास सांगितले. यावरून त्यांच्यात वाद झाला. नंतर वाद वाढला. चौघांनी गणेशला बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर त्याला नाल्यात ढकलून दिले. यात त्याचा जागेवरच मृत्यू झाला. नंतर आरोपी कार तिथेच सोडून फरार झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गाड्या ताब्यात घेतल्या आहेत.
VIDEO : लहान मुलाने बँकेतून अडीच लाख रुपये आरामात लुटले