मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Jalgaon Crime: मायलेकांनी मिळून बापाला संपवलं; धारदार शस्त्राने केली निर्घृण हत्या, काय आहे हत्येमागचं कारण?

Jalgaon Crime: मायलेकांनी मिळून बापाला संपवलं; धारदार शस्त्राने केली निर्घृण हत्या, काय आहे हत्येमागचं कारण?

पप्पांच्या 'त्या' कृत्याला संतापले अन् रागाच्या भरात दोन मुलांनी आईसोबत मिळून बापाला संपवले

पप्पांच्या 'त्या' कृत्याला संतापले अन् रागाच्या भरात दोन मुलांनी आईसोबत मिळून बापाला संपवले

Jalgaon Crime News: पत्नीने आपल्या पतीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. दोन मुलांसोबत मिळून पत्नीने हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

    नितीन नांदुरकर, प्रतिनिधी जळगाव, 11 एप्रिल : पत्नीनेच आपल्या पतीची हत्या केल्याची घटना जळगावातून (Jalgaon) समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा (Pachora) येथे ही घटना घडली आहे. आपल्या दोन मुलांसोबत मिळून पत्नीने पतीची हत्या केली असल्याचं वृत्त आहे. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात (Police detained all three) आले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आता हत्ये मागचं नेमकं कारण काय आहे याचा तपास सुरू आहे. भास्करनगरात संजय खेडकर हे वास्तव्यास होते. संजय खेडकर हे आपली दोन मुले आणि पत्नीसोबत राहत होते. त्यांना प्रतीक व रोहित ही दोन मुले आहेत. संजय खेडकर काहीही कामधंदा करीत नव्हते. ते सतत आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असत. या कारणावरून घरात नेहमीच वाद होत होते. दोन्ही मुलांना देखील ते लहान-सहान गोष्टीवरून बोलत असत. अपमानास्पद वागणूक देत असत. त्यामुळे वडिलांबाबत दोन्ही मुले आणि त्यांच्या आईच्या मनात रोष वाढत गेला. वाचा : तरुणीचा नग्नावस्थेत मृतदेह आढळ्याचं गूढ अखेर उकललं; धक्कादायक माहिती आली समोर त्याच दरम्यान खेडकर कुटुंबीयांत जोरदार वाद झाला. सकाळी पुन्हा वाद उकरून काढण्यात आला. त्या वादात संगनमताने संजय खेडकर यांच्या डोक्यावर आणि शरीरावर हत्याराने वार करण्यात आले. या हल्ल्यात पती संजय खेडकर यांचा मृत्यू झाला. वाचा : थरकाप उडवणारा प्रकार; तरुणाची हत्या करून सुटकेसमध्ये भरला मृतदेह अन् केलं भयंकर ही घटना दुपारी उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह ताब्यात घेऊन पाचोरा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद केली. पोलिसांनी तपास चक्रे फिरवली असता मृताच्या पत्नीसह दोन्ही मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पाचोरा पोलिसांनी या मृत वडिलांच्या दोघा मुलांसह पत्नीला ताब्यात घेऊन खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. प्रेम प्रकरण मुलीच्या आईला कळालं अन् भंडाऱ्यातील तरुणाने आयुष्य संपवलं एका 21 वर्षीय युवकाने स्वताच्या शेतात दोरीच्या सहाय्याने झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखणी तालुक्यातील ही घटना आहे. क्रिष्णा शालिक अतकरी (21 वर्षे) असे मृतकाचे नाव आहे. मृतक क्रिष्णा याचे त्याच्या गावातील अल्पवयीन मुलीसोबत प्रेम संबंध जुळले होते. या प्रेमसंबंधांची माहिती संबंधित मुलीच्या आईला मिळाली. त्यानंतर मुलीच्या आईने क्रिष्णासोबत भांडण केले. आता आपली बदनामी गावभर होणार असल्याची भीती बाळगून क्रिष्णा याने टोकाचं पाऊल उचललं. क्रिष्णा याने स्वतःच्या शेतात जाऊन झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली. या आधी सुद्धा क्रिष्णा याने दोनदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. काल भांडण होताच रात्रभर घरी परत न आल्याने घरच्या लोकांनी शोधाशोध केली, मात्र क्रिष्णा दिसला नाही. आज सकाळी गावातील एका व्यक्तीला मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Crime, Jalgaon, Murder

    पुढील बातम्या