जालना, 21 मे : शहरातील एका महिला लाभार्थीला दोन वेगवेगळ्या लसीचे डोस (Corona Vaccine) देण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाईचा इशारा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी दिला आहे.
राज्यात सध्या कोरोना रुग्णसंख्या (Corona Patients) कमी होत असल्यानं दिलासा मिळाला असला तरी मृतांचं प्रमाण मात्र चिंताजनक आहे. अशा स्थितीत लवकरात-लवकर आणि जास्तीत-जास्त लोकांच लसीकरण करणं गरजेचं आहे. मात्र, अनेक ठिकाणी लस उपलब्ध नसून लसीकरण केंद्रावर अशाप्रकारे सावळा-गोंधळ दिसून येत आहे.
लाभार्थी महिलेला दिले वेगवेगळ्या लसीचे डोस#CovidVaccine #CoronaVaccine #Jalana #जालना pic.twitter.com/5HouhqgcWC
— News18Lokmat (@News18lokmat) May 21, 2021
रंजना अशोक निक्कम (वय 49) असं या महिलेचं नाव असून त्यांनी 16 मार्च रोजी जालना शहरातील आस्था हॉस्पिटलमध्ये कोव्हॅक्सींन लसीचा पहिला डोस घेतला होता. लसीचा तुटवडा निर्माण झाल्यामुळं दुसरा डोस घेण्यासाठी त्यांना जवळपास 50 दिवस प्रतीक्षा कारवाई लागली. दरम्यान, 6 मे रोजी रंजना निक्कम यांनी जालना शहरातील शांतिनिकेतन विद्या मंदिर या शाळेत लसीचा दुसरा डोस घेतला. मात्र, हा डोस घेताना नेमका गोंधळ उडाला. श्रीमती निक्कम यांनी पहिला डोस कोव्हॅक्सीन लसीचा घेतला असताना दुसरा डोस मात्र त्यांना कोव्हिशील्डचा देण्यात आला.
हे वाचा - ‘गरोदर असताना माझ्यावर बलात्कार झाला’; प्रसिद्ध गायिकेचा धक्कादायक खुलासा
दरम्यान, जालना जिल्ह्यात काल 482 नवीन रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे चाचणी अहवालांमधून स्पष्ट झाले. तर राज्यात गुरुवारी (20 मे) 29 हजार 911 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 738 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण जास्त असून काल 47 हजार 371 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात 50 लाख 26 हजार 308 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. मागच्या काही दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असले तरी, उपचारा दरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona spread, Corona updates, Corona vaccination, Corona vaccine, जालना