Home /News /maharashtra /

Shocking! 24 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार, आरोपींमध्ये पुतण्याचाही समावेश, बीडमधील संतापजनक घटना

Shocking! 24 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार, आरोपींमध्ये पुतण्याचाही समावेश, बीडमधील संतापजनक घटना

Representative Image

Representative Image

बीड (Beed) जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे.

बीड, 26 एप्रिल : महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत. आता बीड जिल्ह्यातून (Beed district) एक संतापजनक आणि धक्कादायक अशी बातमी समोर आली आहे. एका 24 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार (woman gangraped) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा एक संतापजनक घटना समोर आलीय. बीडमधील एका 24 वर्षीय विवाहितेवर नात्याने चुलत पुतण्या असणाऱ्या एकाने, गुंगीचे ज्यूस देऊन अहमदनगर शहरात बलात्कार केला. तर दुसऱ्याने अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत इतर दोघांच्या मदतीने बीडच्या काठवटवाडी फाट्यावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडलीय. धक्कादायक म्हणजे यावेळी तिघा नराधमांनी रात्रभर छेड काढली. वाचा : राणा दाम्पत्याला आणखी एक झटका नात्यातीलचं नराधम तरुणांनी हे कृत्य केल्यानं बीड जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांत नराधम चुलत पुतण्या अजय गवते याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तर पप्पू नरहरी गवते, दत्ता गवते, परमेश्वर गवते सर्व रा. बेलुरा या तिघांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय. सध्या आरोपी फरार असून पोलीस शोध घेत आहेत. हरियाणात पतीच्या समोर हॉटेलमध्ये एका मित्राने पत्नीवर केला बलात्कार हरियाणातील रेवाडी जिल्ह्यात एका महिलेवर तिच्याच पतीच्या दोन मित्रांनी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका मित्राने पतीसमोर हॉटेलमध्ये मित्राने घरात घुसून महिलेसोबत घृणास्पद कृत्य केलं. या प्रकरणात पती आणि त्याच्या मित्राला पोलिसांनी अटक केली आहे. तर दुसरा आरोपी फरार झाला आहे. रेवाडीच्या रामपूर भागातील पीडितेने सांगितलं की, 5 मार्च 2022 रोजी तिच्यासोबत पहिल्यांदा बलात्कार करण्यात आला. यावेळी महिलेचा पती तिला दिल्लीतील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला होता. येथे पतीच्या मित्राने तिच्यावर हॉटेलमध्ये बलात्कार केला. पतीने विरोध करण्याऐवजी तिला तोंड बंद ठेवण्याची धमकी दिली. यामुळे पत्नीदेखील घाबरून गेली. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, 13 एप्रिल रोजी तिचा पती आणि सासू एका नातेवाईकांकडे गेले होते. यावेळी पतीने दुसऱ्या मित्राला घरी बोलावलं आणि तिच्यावर बलात्कार केला. यावेळी मात्र पत्नीने आपल्या आईला सांगितलं. आईने तातडीने पोलिसांकडे याबाबत तक्रार केली.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Beed, Crime, Gang Rape, Maharashtra News

पुढील बातम्या