BREAKING: टोकावर उभं राहून सेल्फी काढताना महिला थेट दरीत कोसळली

खरंतर सेल्फीच्या प्रेमामुळे अनेक दुर्घटना घडतात. काहींना तर आपला प्राणही गमवावा लागला तर काहींच्या हा सेल्फी जीवावर बेतला.

News18 Lokmat | Updated On: Sep 24, 2019 09:43 AM IST

BREAKING: टोकावर उभं राहून सेल्फी काढताना महिला थेट दरीत कोसळली

प्रशांत बाग, प्रतिनिधी

सापुतारा (गुजरात),  24 सप्टेंबर : सेल्फी काढताना दुर्घटना झाल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं आहे. असाच एक धक्कादायक प्रकार नाशिकच्या महिलेसोबत घडला आहे. खरंतर अनेकांचं सेल्फीचं प्रेम हे दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. आपण कुठेही गेलो की लागलीच सेल्फी काढायची आणि सोशल मीडियावर टाकायची. याचं वेड लागलेली एक नवीन सोशल जमात उदयाला आली आहे. पोस्टला मिळणाऱ्या लाईक्स, त्यावर होणारं कौतुक आणि यातून मिळणारा आनंद अशी सध्याची लोकं जगत असतात. खरंतर सेल्फीच्या प्रेमामुळे अनेक दुर्घटना घडतात. काहींना तर आपला प्राणही गमवावा लागला तर काहींच्या हा सेल्फी जीवावर बेतला. सापुताऱ्याला अश्याच एका दुर्घटनेत सेल्फीने महिलेचा जीव घेतला आहे. नाशिकची एक महिला थेट दरीत कोसळली आहे.

सेल्फी काढताना महिलेचा पाय घसरला आणि ती खोल दरीत कोसळली. सुषमा मिलिंद पगारे असं या महिलेचं नाव आहे. यामध्ये सुदैवाने सुषमा यांचा जीव वाचला आहे. पण त्या गंभीर जखमी झाली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यांना दरीतून बाहेर काढत उपचारासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

इतर बातम्या - मुंबई हादरली, इंटरव्ह्यूसाठी गेलेल्या MBA तरुणीवर नराधमाने केला बलात्कार!

बोरगाव जवळील गुजरात राज्यातील सापुतारा इथे आपल्या कुटूंबासमवेत फिरण्यास आलेली नाशिकची महिला सुषमा मिलिंद पगारे या सन राईस पांईटवर लॉरी मल्ला चालवत नैसर्गिक सौंदर्याचे फोटो सेल्फीने आपल्या मोबाईलमध्ये टिपत होत्या. त्यावेळी त्यांचं अचानक लक्ष विचलित झालं आणि पाय घसरून खोल खिंडीत पडल्या. दैव बल्लवतर म्हणून त्या या अपघातातून वाचल्या. उंचावरून खोल दरीत पडल्यामुळे सुषमा यांच्या कमरेला आणी चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. नवागाव इथल्या तरुणांनी त्यांना खोल दरीतून बाहेर काढलं आहे.

Loading...

Special Report : मनसेचं ठरलं! 122 जागांसाठी अशी केली तयारी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 24, 2019 09:40 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...