Home /News /maharashtra /

कोल्हापुरातील तरुणीला मालवणमध्ये जीवदान; थेट बाहेर काढलं समुद्रातून

कोल्हापुरातील तरुणीला मालवणमध्ये जीवदान; थेट बाहेर काढलं समुद्रातून

Crime in Malwan: मालवण तालुक्यातील तळाशील येथील समुद्रात उतरलेल्या एका 33 वर्षीय तरुणीला स्थानिक ग्रामस्थांनी जीवदान दिलं आहे.

    कोल्हापूर, 10 डिसेंबर: मालवण (Malwan) तालुक्यातील तळाशील येथील समुद्रात उतरलेल्या एका 33 वर्षीय तरुणीला स्थानिक ग्रामस्थांनी जीवदान दिलं आहे. ग्रामस्थानी आपला जीव धोक्यात घालून संबंधित तरुणीला समुद्रातून बाहेर काढलं (woman pulled out of the sea) आहे. यानंतर स्थानिकांनी तरुणीला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. तरुणीची चौकशी केली असता ती कोल्हापूर (Kolhapur) येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी पीडित तरुणीच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास एक 33 वर्षीय तरुणी मालवण तालुक्यातील तळाशील येथील समुद्राच्या पाण्यात उतरली होती. एकंदरीत तिच्या सर्व हालचाली संशयास्पद वाटत होत्या. ही बाब स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. त्यांनी त्वरित तरुणीच्या दिशेनं धाव घेतली आणि तिला पाण्यातून बाहेर काढलं आहे. संबंधित तरुणी समुद्राच्या पाण्यात नेमक्या कोणत्या उद्देशाने उतरली होती, याची कोणतीही माहिती समोर आली नाही. हेही वाचा-'तुझे फोटो काढतो', म्हणत विहिरीच्या काठावर केलं उभं; तरुणाला दिला भयंकर मृत्यू गावकऱ्यांनी तरुणीला पाण्यातून बाहेर काढत तिला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. मालवण पोलिसांनी केलेल्या चौकशीत संबंधित तरुणी कोल्हापूर येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. ते कोल्हापुरातून मालवणला आली होती. येथून ती एका रिक्षाने तळाशील समुद्र किनारी आली. याठिकाणी रिक्षातून उतरल्यानंतर ती थेट समुद्राच्या पाण्यात उतरली होती. तिच्या सर्व एकंदरीत सर्व हालचाली संशयास्पद वाटत होत्या. हेही वाचा-Nagpur:आईला मारहाण करणाऱ्या तरुणाला नियतीनं दिली शिक्षा; पोलीस ठाण्यातच झाला अंत ही बाब स्थानिकांच्या लक्षात आल्यानंतर, त्यांनी प्रसंगावधान दाखवत घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी तरुणीला सुखरुप समुद्राच्या पाण्यातून बाहेर काढलं आहे. पोलिसांनी या घटनेची माहिती संबंधित तरुणीच्या घरच्यांना दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news

    पुढील बातम्या