Home /News /maharashtra /

Beed: महिलेची छेड काढून शूट केला व्हिडीओ, जाब विचारण्यासाठी गेलेल्या कुटुंबालाच जमावाकडून लाठ्या-काठ्यांनी मारहाण

Beed: महिलेची छेड काढून शूट केला व्हिडीओ, जाब विचारण्यासाठी गेलेल्या कुटुंबालाच जमावाकडून लाठ्या-काठ्यांनी मारहाण

महिलेची छेड काढून शूट केला व्हिडीओ, जाब विचारण्यासाठी गेलेल्या कुटुंबालाच लाठ्या-काठ्यांनी मारहाण

महिलेची छेड काढून शूट केला व्हिडीओ, जाब विचारण्यासाठी गेलेल्या कुटुंबालाच लाठ्या-काठ्यांनी मारहाण

Beed Crime News: महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत. आता बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

बीड, 19 मे : महिलेची छेड काढत (eve-teasing) व्हिडीओ काढला याचा जाब विचारायला गेलेल्या पीडितेच्या परिवाराला बेदम मारहाण (victim family beaten by accused) केल्याचा प्रकार समोर आला आहे. बीड (Beed)च्या कामखेडा गावातील या प्रकारामुळे खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे या मारहाणीचा व्हिडीओ समोर आला आहे. यात लाठ्या-काठ्या आणि व्हिडीओमधील तुफान हाणामारी पाहून अंगावर काटा येईल. या मारहाणीत दोघे जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बीड तालुक्यातील कामखेडा गावात पाणी भरण्यासाठी केलेला महिलेची छेड काढत व्हिडीओ काढला. यानंतर याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पीडित महिलेच्या कुटुंबातील सदस्यांवर जमावाने हल्ला केला. दहा ते पंधरा लोकांनी हा हल्ला केला. या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाचा : पत्नी, सासू आणि मामाकडून सततचा छळ, मारहाण; कंटाळून तरुणाने घेतला मोठा निर्णय या प्रकरणाला दोन दिवस होऊनही अद्यापपर्यंत कारवाई केली नाहीये. त्यामुळे हल्ला करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी पीडित कुटुंबांनी केली आहे. या संदर्भात बीड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे असं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलीस भरतीची प्रॅक्टिस करणाऱ्या महिलेची छेडछाड बीडमधून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यात पुन्हा एकदा धक्कादायक आणि संतापजनक घटना बीड शहरात उघडकीस आलीय. पोलीस भरतीची प्रॅक्टिस करणाऱ्या विवाहित महिलेची गुंड रोडरोमिओंनी छेडछाड काढल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील 26 वर्षीय विवाहित महिला गेल्या अनेक दिवसांपासून आपलं पोलीस बनण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी, जिवाचे रान करत आहे. 5 मे रोजी पहाटे पावणे पाचच्या दरम्यान पोलीस भरती करणाऱ्या आपल्या मित्रासोबत, ती शहरातील चराटा फाटा परिसरातील ग्राउंडवर प्रॅक्टिससाठी गेली होती. यावेळी दोन गुंड प्रवृत्तीच्या रोडरोमिओंनी तिच्यासमोर गाडी आडवी लावून अडवलं. "तुझं स्कार्फ सोड, मला तुझा फोटो काढायचा आहे." असं म्हणत त्या गुंडांनी चाकू दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Beed, Crime, Maharashtra News

पुढील बातम्या