खड्ड्यांमुळे गेला महिलेचा जीव, नागरिकांचा आक्रोश

ही महिला शेलार येथे ट्युशन क्लास चालवत असून ती मुलीला काल्हेर येथील माहेरी आईकडे सोडून घरी परतत होती. त्यावेळी खड्डा चुकवताना एका कारने तिच्या Activa ला जोरदार धडक दिली.

News18 Lokmat | Updated On: Aug 6, 2019 04:44 PM IST

खड्ड्यांमुळे गेला महिलेचा जीव, नागरिकांचा आक्रोश

रवी शिंदे, भिवंडी 6 ऑगस्ट : मुसळधार पावसामुळे रस्त्यांची चाळण झालीय. आधीच खराब असलेल्या रस्त्यात खड्डे झाल्यानं याच खड्ड्याने एक महिलेचा जीव घेतलाय. खड्डा चुकवताना झालेल्या अपघातात या महिलाच्या दुचाकीला एका कारने धडक दिली त्यात या महिलेचे मृत्यू झाला. या घटनेमुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून आणखी किती लोकांचा बळी घेणार आहात असा सरकारला प्रश्न विचारला आहे. गेल्या पाच दिवसांपासून ठाणे, भिवंडी आणि मुंबई या भागात मुसळधार पासून सुरू होता.

LIC नं लाँच केली नवी पाॅलिसी, रोज 22 रुपये खर्च करून मिळतील हे 4 फायदे

श्रद्धा राकेश पुण्यार्थी (३२ रा. कासारआळी ) असं अपघातात ठार झालेल्या महिलेचं नांव आहे. ही  महिला शेलार येथे ट्युशन क्लास चालवत असून ती  मुलीला काल्हेर येथील माहेरी आईकडे सोडून घरी परतत होती. त्यावेळी खड्डा चुकवताना एका कारने तिच्या Activaला जोरदार धडक दिली. यामध्ये श्रद्धा हिच्या छातीला व डोक्याला गंभीर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

'अमित शहांनी धोका दिला' म्हणत माजी मुख्यमंत्री रडू लागले...

पावसामुळे रस्त्यात एवढे खड्डे आहेत की एक खड्डा चुकवताना दुसऱ्या खड्ड्यात पडण्याची भीती असते. पाऊस नसला तरीही इथल्या रस्त्यांवर कायम खड्डे असतात अशी तक्रारही नागरिकांनी केलीय. शनिवार आणि रविवारी झालेल्या प्रचंड पावसामुळे मुंबई आणि कोकणाला झोडपून काढलं होतं.

Loading...

टॉप सिक्रेट होतं 'मिशन काश्मीर', अमित शहांनी अशी केली मोहीम फत्ते

कोल्हापूरात मुसळधार, दुध संकलन रखडलं

अतिवृष्टीमुळ कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळने दूध संकलन (आज व उद्या सकाळी) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. संकलित झालेले दूध वितरण करण्यात मोठ्या अडचणी येत असून दूध संकलन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, कोकण आणि गोवावासियांना यामुळे दूध टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

LIVE VIDEO पाण्यात गाडी घालण्याचं धाडस पडलं महागात; कारसह नदीत वाहून गेला तरुण

गोकुळचे दररोज साधारण ९ लाख ५० हजार लिटर दूध संकलन असून वितरण ११ ते ११.५ लाख लिटरपर्यंत आहे. सकाळच्या ५ लाख लिटर संकलनापैकी आज सकाळी २ लाख ३२ हजार लि. दूध संकलन झाले आहे. दररोज वितरणासाठी लागणारे दूध तसेच शिल्लक असल्याने दररोज होणाऱ्या दूध संकलनाने त्यावर आणखी विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 6, 2019 04:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...