सिझेरियन करताना महिलेच्या पोटात राहिला कापसाचा गोळा, तीनच दिवसात मृत्यू

सिझेरियन करताना महिलेच्या पोटात राहिला कापसाचा गोळा, तीनच दिवसात मृत्यू

पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये पोटात कापसाचा गोळा राहिल्याचं लक्षात आल्यानंतर नातेवाईकांना मोठा धक्का बसला. संबंधीत डॉक्टरांना निलंबित करण्यात आलंय.

  • Share this:

सिध्दार्थ गोदाम, औरंगाबाद 2 ऑगस्ट : औरंगाबाद गंगापूरच्या शासकीय रुग्णालयातला अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आलाय. एका वीस वर्षीय महिलेचं सिझेरियन झाल्यानंतर कापसाचा बोळा पोटात राहिल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. बाळांतपणानंतर तीनच दिवसात महिलेचा मृत्यू झाला. पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये पोटात कापसाचा गोळा राहिल्याचं लक्षात आल्यानंतर नातेवाईकांना मोठा धक्का बसला. डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी नातेवाईकांनी केलीय. संबंधीत डॉक्टरांना निलंबित करण्यात आलंय.

तनुश्री तुपे असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. तनुश्रीच सिझेरियन झाल्यानंतर तीन दिवसानंतर उलट्या मळमळीचा त्रास होऊ लागला आणि त्यातच 28 जुलै रोजी निधन झालं. पोस्टमार्टेम मध्ये महिलेच्या पोटात कापसाचा बोळा राहील्याचा रिपोर्ट आलाय. त्यामुळे नातेवाईकांना धक्का बसला. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोपही नातेवाईकांनी केलाय. महिलेला मुलगा झाला होता. त्याची प्रकृती आता चांगली आहे. मात्र त्या चिमुकल्याला आता आपली आई कधीच पाहता येणार नाही.

मुख्यमंत्री खोटं बोलताहेत, त्यांना WhatsApp विद्यापीठाने माहिती दिली का?'

त्यानंतर पीडित महिलेच्या नातेवाईकांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिलीय. जिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांचा (सी एस) याप्रकरणी रिपोर्ट आल्यानंतर पोलीस डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करणार आहेत.

एकाच दिवशी तीन मुलींचं अपहरण

मुसळधार पावसाने नाशिकला फटका दिलेला असतानाच आणखी एका धक्कादायक घटनेनं शहरात खळबळ उडालीय. शहरात एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुलींचं अपहरण झाल्याच्या तक्रारी मिळाल्यानं पालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. यातल्या दोन मुली या मैत्रिणी आहेत. शाळेत आणि क्लासेसला जातो असं सांगून या मैत्रिणी घराबाहेर पडल्या आणि पुन्हा घरी आल्याच नाहीत अशी माहिती मिळतेय. या सर्व घटनांचा पोलीस तपास करत आहेत.

भूमिपुत्रांना नोकरीत 80 टक्के प्राधान्य देणारे महाराष्ट्र पहिले राज्य

गेल्या दोन दिवसांपासून या मुली घरातून बेपत्ता आहेत. क्लासेस आणि शाळेला जातो असं सांगून त्या घरातून बाहेर पडल्या आणि पुन्हा आल्याच नाहीत. या मुली कुठे मैत्रिणीकडे किंवा नातेवाईकांकडे गेल्या असतील असं वाटून त्यांच्या कुटुंबीयांनी गेली दोन दिवस शोधाशोध केली. त्यांच्या मित्रमैत्रिणींकडे विचारपूस केली मात्र कुठेच त्यांचा पत्ता लागला नाही त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे.

ED चौकशी होणार? राज ठाकरेंनी दिली पहिली प्रतिक्रिया

त्यांचे पालक जसे चौकशी करत होते तसं त्यांना वेगवेगळी माहितीही मिळत होती. त्यामुळे शेवटी पालकांनी नाशिकच्या अंबड आणि मुंबई नाका पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केलाय. यातल्या दोन मैत्रिणींना फुस लावून पळविण्यात आल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी विविध अंगांनी पोलीस तपास करत आहेत.

प्रेम प्रकरणातून या मुली गेल्यात की त्यांना फूस लावून नेण्यात आलं याबाबत पोलिसांच्या तपासाची चक्र फिरत आहेत. मुली अल्पवयीन असल्याने पोलिसांची चिंता वाढली आहे. मुलींच्या शाळेत, नातेवाईकांकडे आणि मित्र मैत्रिणींकडे पोलीस तपास करत असून काही धागेदोरे मिळाले असल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 2, 2019, 7:16 PM IST

ताज्या बातम्या