सातारा, 15 जुलैः संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन घेऊन येताना एका महिलेचा रात्री रस्ता ओलांडताना दुर्दैवी मृत्यू झाला. कविता विशाल तोष्णीवाल (42) यांना पाण्याच्या टँकरने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर येथील विशाल तोष्णीवाल आणि त्यांचे कुंटुबीय श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन घेण्यासाठी आणि अन्नदान करण्यासाठी शनिवारी रात्री तरडगाव येथे गेले होते.
रात्री 12.30 वाजता माऊलीचे दर्शन घेतल्यानंतर पालखी तळाजवळ लोणंद- फलटण रोड क्रॉस करण्यासाठी मध्यभागी डिव्हायडरवर थांबलेल्या होत्या. यावेळी कविता यांना लोणंदकडून फलटणकडे जाणाऱ्या पाणी टँकर क्र. एमएच १०- झेड- २७०८ ने जोरदार धडक दिली. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातावेळी दोन लहान मुलंही त्यांच्यासोबत होती. मुलांसमोरच हा अपघात झाल्यामुळे वारकरी संतप्त झाले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. या प्रकरणी लोणंद पोलीस स्टेशनमध्ये टँकर चालक यशवंत पावले, सांगली याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचाः
'5 बळी गेले पण 5 लाख लोक घरी सुरक्षित तर जातात ना,' चंद्रकांत पाटील यांचं अजब विधान
अमित ठाकरेंच्या या 10 गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Truck accident, Wari, Woman died, अपघात, वारी