मुंबई, 10 ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मोठ्या कटआउट्सच्या पुढे उभं राहून मदतीसाठी याचना करत रडणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हम मोदीजी को भगवान मानते थे, उनको वोट दिया... अब हम डूब गए है, लूट गए है हमारी मदद करों.. अशी याचना करत ही महिला रडत असलेली या व्हिडिओत दिसते. अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. काही जणांनी VIDEO शेअर करताना ही महिला PMC बँकेच्या खातेदार असल्याचा दावा केला आहे. भाजपच्या कार्यालयात जाऊन त्या महिलेनं मदतीची याचना केली, असं सांगण्यात येत आहे.
मोदींच्या कटआउट्चे पाय धरून मदतीची याचना करताना ही महिला म्हणते, 'विदेशात जाऊन तुम्ही मदत करता. आमचं भलं करा. आम्ही तुम्हाला मतं दिली आहेत. भीक मागायची वेळ आली आहे. आमचा पैसा मिळवून द्या.'
वाचा - 'आमचे पैसे परत द्या', PMC बँकेच्या खातेदारांचा निर्मला सीतारामन यांना घेराव
दुसऱ्या खोलीत बसलेल्या कार्यकर्त्यांकडे जाऊन 'इतकं मोठं ऑफिस उघडून बसला आहात, मग आम्हाला मदत करा', असंही ही महिला बोलत असलेली दिसते.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मध्य प्रदेश काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरूनही हा व्हिडिओ शेअर झाला आहे.
कमल पर मतदान की सजा पाते हैं,
बैंकों के सामने बिलखते नज़र आते हैं।
—मोदी जी को वोट देने के बाद इस तरह का मंजर अब आम हो गया है, पता ही नहीं चला कब हाथ पर बजते-बजते ताली गाल पर बजने लगी।
मोदी जी,
देश की जनता का क़सूर सिर्फ़ इतना है कि ये आपके झूठे प्रचार से गुमराह हो गये। pic.twitter.com/beQLejCwed
— MP Congress (@INCMP) October 10, 2019
याशिवाय काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी हा व्हिडिओ ट्वीट, रिट्वीट केलेला दिसतो. ही महिला PMC बँकेची खातेदार आहे आणि नुकसान झाल्यामुळे रडते आहे, असा दावा केला जात आहे. नेमकी ही स्त्री कोण आणि ती कुठे आणि कधी हे सगळं बोलली याची शहानिशा News18Lokmat करत आहे. अद्याप आम्ही या व्हिडिओची सत्यता पडताळलेली नाही.
संबंधित बातम्या
SBI ने तब्बल 76 हजार 600 कोटींचं कर्ज टाकलं बुडित खात्यात, 220 जण दिवाळखोरीत
आर्थिक तोट्यामुळे 'या' मोठ्या कंपन्या लवकरच बंद होणार! मोदी सरकारचा मोठा निर्णय
1 जानेवारीपर्यंत 'हे' काम केलं नाही, तर तुम्हाला बँकेतून काढता येणार नाही रक्कम
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा