गावगुंडांचा हैदोस, रेल्वे डब्याची दारं बंद करून महिलांना लाठ्या-काठ्याने मारहाण

गावगुंडांचा हैदोस, रेल्वे डब्याची दारं बंद करून महिलांना लाठ्या-काठ्याने मारहाण

कुर्डूवाडी ते पारेवाडी स्टेशन दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडलाय 15 ते 20 जणांच्या टोळक्याने ही मारहाण केली.

  • Share this:

30 मे : पुणे-सोलापूर पॅसेंजरमध्ये महिला प्रवाशांना लाठ्या-काठ्याने अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीये. कुर्डूवाडी ते पारेवाडी स्टेशन दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडलाय 15 ते 20 जणांच्या टोळक्याने ही मारहाण केली.

पुणे-सोलापूर पॅसेंजर कुर्डूवाडी स्टेशनजवळ पोहचली तेव्हा प्रेमा भोसले यांचा एका महिलेला धक्का लागला. एकमेकांना धक्का लागल्याच्या वादातून दोन्ही महिलांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर या महिलेनं 15 ते 20 तरुणांना बोलावून घेतलं. लाठ्या-काठ्या घेऊन रेल्वेच्या डब्यात घुसलेल्या तरुणांनी भोसले कुटुंबियावर जोरदार हल्ला केला. प्रेमा भोसले यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील लहान मुलांना सुद्धा बेदम मारहाण करण्यात आली.

सर्वात गंभीर बाब म्हणजे रेल्वे डब्याची दारं खिडक्या बंद करून ही मारहाण केल्याचा आरोप प्रेमा भोसले यांनी केला. या प्रकरणी दौंड लोहमार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस पुढील तपास करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 30, 2017 04:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading