महिला बॅंकरच्या पतीचं मुंबईत 'बिहार स्टाईल' अपहरण करून खाडीत फेकलं

महिला बॅंकरच्या पतीचं मुंबईत 'बिहार स्टाईल' अपहरण करून खाडीत फेकलं

अपहरण झालेल्या व्यक्तीचा अजूनही ठांग पत्ता लागलेली नाही....

  • Share this:

मुंबई, 6 नोव्हेंबर: मुंबईत बोरीवलीतील गोराई परिसरात एका महिला बॅंकरच्या पतीचं भरदिवसा 'बिहार स्लाईल' अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अपहरणकर्त्यांनी महिलेच्या पतीला कळवा येथील खाडीत फेकल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस बेपत्ता व्यक्तीचा शोध घेत आहेत.

रिक्षात जबरदस्तीनं बसवून अपहरण केल्याप्रकरणी 2 आरोपींना मुंबई पोलिस गुन्हे शाखेच्या युनिट नंबर 11 ने (संगमनेर, जि.अहमदनगर) येथून अटक केली आहे.

हेही वाचा...मालेगावात मोठी कारवाई, बांगलादेशी घुसेखोराच्या मुसक्या आवळल्या

मिळालेली माहिती अशी की, बोरीवलीतील गोराई येथे 3 तारखेला दिल्ली येथे बॅंकेत उच्चपदस्थ काम करणाऱ्या एका महिलेच्या पतीचं भरदिवसा दोन व्यक्तींनी अपहरण केलं. नंतर त्याला बेदम मारहाण करून, जबरदस्तीनं दारू पाजून ठाणे जिल्ह्यातील कळवा खाडीत फेकून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नंतर अपहरणकर्त्ये नाशिकला गेले. पुढे त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे पळ काढला. मात्र, मुंबई पोलिसांनी आधीच सापळा रचला होता. त्यानुसार दोन्ही आरोपींना जेरबंद करण्यात आलं आहे.

समोर आली धक्कादायक माहिती.

पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपहरण केलेली व्यक्ती ही आरोपींच्या परिचयाची होती. पाच वर्षांपूर्वी एकत्र दारु पित असताना महिलेच्या पतीनं अपहरणकर्त्यांना मारहाण करून शिवीगाळ केली होती. त्याचाच राग मनात धरुन 3 नोव्हेंबरला दुपारी आरोपीनी महिलेच्या पतीचं अपहरण केलं. त्याला दारु पाजून खूप मारहाण केली. नंतर त्याला कळवा खाडीत (जि. ठाणे) ढकलून दिलं. नंतर दोन्ही आरोपी पुढे नाशिक आणि नंतर संगमनेर येथे पळून गेले.

हेही वाचा...मासेमारी मामा-भाच्याच्या जीवावर बेतली, पुण्यात महादेवाच्या तळ्यात बुडून मृत्यू

दरम्यान, अपहरण झालेल्या व्यक्तीचा अजूनही ठांग पत्ता लागलेली नाही. कळवा खाडीच्या हद्दीतील सर्व पोलिस स्टेशनला या घटनेची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, घडलेल्या या घटनेमुळे गोराईत एकच खळबळ उडाली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: November 6, 2020, 5:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading